संरक्षण मंत्रालय

सैन्य व्यवहार विभागमार्फत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमावर आधारित दोन दिवसीय विचारमंथनाचे आयोजन

Posted On: 03 MAR 2024 12:39PM by PIB Mumbai

 

आत्मनिर्भर भारत आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमामागचे चैतन्य गतिशील  करत, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत लष्करी व्यवहार विभाग, पुढचे दोन दिवस 4-5 मार्च 2024 रोजी सेवा मुख्यालय आणि संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण उद्योग प्रतिनिधी आणि इतर संबंधित भागीदार तसेच  महत्त्वाच्या भागधारकांदरम्यान एक गहन विचारमंथन आयोजित करत आहे. स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संरक्षण, संशोधन आणि विकास आणि उत्पादन परिसंस्थेमध्ये खाजगी उद्योगाचा सहभाग वाढविण्यासाठी अंमलबजावणीयोग्य मार्ग आणि साधने तयार करण्यासाठी उच्च-स्तरीय विचारविनिमयाद्वारे आणि सहभागी प्रक्रियांद्वारे प्राप्त झालेले निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरतील.

संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान या सत्राच्या अध्यक्षस्थानी असंतील, तर संरक्षण सचिव

गिरीधर अरमाने प्रमुख वक्ते असंतील. आव्हानांची ओळख आणि सशस्त्र दलांच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी पुढील मार्ग विकसित करणे, उदरनिर्वाहाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे, संरक्षण, संशोधन आणि विकास आणि उत्पादन परिसंस्थेमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सशस्त्र दलांसाठी देखभाल, दुरुस्ती आणि सर्वंकष सुविधा तयार करणे आणि वर्धित करणे अशा विस्तृत विषयांचा या कार्यक्रमात समावेश आहे.

मुख्यालय, एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि भारतीय संरक्षण उत्पादन संस्था या कार्यक्रमाचे समन्वय साधत आहेत आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांना आणखी बळकट करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, सेवा आणि उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींचा सहभाग एकाच छताखाली दिसून येईल. यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचा मार्ग सुकर होईल.

***

S.Pophale/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011072) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil