भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना जाहीर प्रचारात योग्य वर्तणूक ठेवण्याबाबत दिली समज, आदर्श आचार संहितेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघनांविरुद्ध कठोर कारवाईचा दिला इशारा


आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने स्टार प्रचारक आणि उमेदवारांवर टाकली अतिरिक्त जबाबदारी

आदर्श आचार संहितेसंबंधी कठोर कारवाई टाळण्यासाठी प्रचलित पद्धती वापरून अशा अप्रत्यक्ष उल्लंघनांची यापूर्वीची उदाहरणे मार्गदर्शक सूचनेत केली उद्धृत

Posted On: 01 MAR 2024 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2024 

 

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राजकीय प्रचाराचे विविध कल आणि ढासळत्या पातळीची दखल घेऊन, केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सार्वजनिक प्रचारात सभ्य वर्तन आणि संयम राखण्यासाठी आणि निवडणूक प्रचाराची पातळी, समस्या आधारित चर्चेपर्यंत उंचावण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आदर्श आचार संहितेसंबंधी उल्लंघन टाळण्यासाठी निवडणुकीदरम्यान पूर्वीच्या प्रचलित  पद्धतींचे उल्लंघन झाल्यास आयोगाने स्टार प्रचारक आणि उमेदवारांना ‘नोटीस ’ दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये वेळ आणि आशय संदर्भात देण्यात येणाऱ्या नोटिसांवर पुन्हा काम करण्यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहितेच्या कोणत्याही अप्रत्यक्ष उल्लंघनांचे मूल्यांकन करेल. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी, निवडणुकीचे सर्व टप्पे आणि भौगोलिक क्षेत्र हे गुन्ह्यांची  "पुनरावृत्ती" निश्चित करण्याचा  आधार असतील.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समान संधी यांमध्ये समतोल राखण्याची गरज ओळखून , मार्गदर्शक सूचनेत नमूद केले आहे की आयोगाने मागील काही निवडणुकांपासून आत्म - संयमी दृष्टीकोन अवलंबला असून असे  गृहीत धरले आहे की त्यांची  सूचना उमेदवार किंवा स्टार प्रचारक यांच्यासाठी नैतिक खच्चीकरण  म्हणून काम करेल. आयोगाने जारी केलेले आदेश पूर्णपणे मनाई न करता   प्रचारात  कमीत कमी अडथळे येतील यादृष्टीने काळजीपूर्वक तयार केले आहेत.

आचारसंहिता  नोटिसांचा न्याय्य रीतीने वापर करून, नैतिक खच्चीकरणाप्रमाणेच, भाषणाचा स्तर  तपासण्याचा उद्देश पुढील निवडणुकीत गैरसमज आणि पुनरावृत्ती होणार नाही हा आहे. याव्यतिरिक्त, मार्गदर्शक सूचनेत माहिती तंत्रज्ञानाच्या विकसित परिदृश्याचा उल्लेख आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आदर्श आचार संहिता लागू होण्यापूर्वीच्या  आणि निवडणुकीपूर्वीच्या 48-तासांच्या  कालावधीमधील रेषा अस्पष्ट केल्या आहेत, ज्यामुळे प्रचाराच्या अनेक टप्प्यांमध्ये आणि असंबंधित निवडणुकामध्ये  देखील प्रचार सामग्रीचा सातत्याने प्रसार होतो .

राजकीय पक्ष, उमेदवार आणि स्टार प्रचारकांसाठी मार्गदर्शक सूचना:

  • मतदारांच्या जातीय/धार्मिक  भावनांच्या आधारे कोणतेही आवाहन  केले जाणार नाही. विद्यमान मतभेद वाढवणारे किंवा एकमेकांबाबत  द्वेष निर्माण करणारे किंवा विविध जाती/समुदाय/धार्मिक/भाषिक गटांमध्ये तणाव निर्माण होईल अशी  कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
  • राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तथ्य नसलेली खोटी विधाने, वक्तव्ये करू नयेत. असत्यापित आरोपांच्या आधारे किंवा प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने इतर पक्षांवर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करणे टाळले पाहिजे
  • इतर पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित नसलेल्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करायची नाही. प्रतिस्पर्ध्यांचा अपमान करण्यासाठी खालच्या पातळीवरील वैयक्तिक टीका करू नये.
  • कोणतीही मंदिरे/मशीद/चर्च/गुरुद्वारा किंवा कोणतीही प्रार्थनास्थळे निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा निवडणूक कार्यासाठी वापरू नयेत. भक्त आणि देवता यांच्यातील संबंधांची खिल्ली उडवणारे किंवा दैवी निंदेचे संदर्भ  देऊ नयेत.
  • राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेला प्रतिकूल असे कोणतेही कृत्य/कृती/उच्चार टाळावेत.
  • असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये देऊ नयेत.
  • विशेष बातमी म्हणून बनावट जाहिराती देऊ नयेत.
  • प्रतिस्पर्ध्यांची बदनामी आणि अपमान करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्स किंवा हीन दर्जाच्या किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी पोस्ट किंवा सामायिक करू नयेत.

आयोगाने सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना आदर्श आचारसंहिता आणि कायदेशीर चौकटीच्या मर्यादेत राहण्याचे आवाहन केले आहे. एमसीसी आणि सरोगेट म्हणजे निवडणूक प्रचाराची पातळी कमी करण्यासाठी सरोगेट किंवा अप्रत्यक्ष उल्लंघनाच्या कोणत्याही प्रकारांवर आयोगाकडून कठोर कारवाई केली जाईल यावर जोर देण्यात आला आहे.

मागील निवडणुकांदरम्यान लक्षात आलेले अप्रत्यक्ष/सरोगेट एमसीसी उल्लंघनाचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  • इतर राजकीय पक्ष (पक्षांच्या) स्टार प्रचारकांविरुद्ध अयोग्य, काही वेळा अपमानास्पद, शब्दसंग्रहाचा वापर
  • खोटे, गणना न करता येणारे, अप्रमाणित, चुकीचे आणि असत्यापित आरोप,
  • दैवी निंदा/वैयक्तिक अपमान व्यक्त करणारे अपशब्द,
  • विडंबनाची मर्यादा पातळी ओलांडणाऱ्या अपमानास्पद आणि निंदनीय सोशल मीडिया पोस्ट/व्यंगचित्र
  • चुकीची माहिती किंवा अपप्रचारासाठी, संदर्भरहित सोशल मीडिया पोस्ट सादर करणे.
  • मतदानाच्या काही दिवस आधी बातम्यांच्या आडून दिशाभूल करणाऱ्या असंतोष पसरवणाऱ्या जाहिराती
  • राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर वैयक्तिक हल्ले करणे आणि प्रतिस्पर्धी पक्षांच्या उमेदवारांची खिल्ली उडवणे
  • राज्य सरकार त्यांच्या कल्याणकारी योजना निवडणूक होणाऱ्या शेजारील राज्यांमध्ये समयोचित वेळी प्रकाशित करते
  • अस्तित्वात नसलेल्या योजनांतर्गत आश्वासने देण्यासाठी नोंदणीचे आमिष दाखवून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न, जे अनेकदा खोट्या आश्वासनांद्वारे मतदारांना लाच देण्यासारखे असते.
  • मतदारांच्या समूहाविरुद्ध सामान्यीकृत टिप्पण्या करण्यासाठी उमेदवाराच्या नावाचा वापर

पार्श्वभूमी:

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 77 अंतर्गत "स्टार प्रचारक" म्हणून नियुक्त केलेले राजकीय पक्ष नेते, महत्त्वपूर्ण राजकीय रॅलींमध्ये भाषणे देतात. आदर्श आचारसंहिता (MCC) आणि कायद्याच्या वैधानिक तरतुदी एकमेकांना पूरक असल्यामुळे सुसंवादी आणि हेतूपूर्ण रचनेच्या चौकटीत याचा अर्थ लावणे आवश्यक आहे. म्हणून, कलम 77 द्वारे प्रदान केलेल्या विशेषाधिकारांचा आनंद घेताना, स्टार प्रचारक निवडणूक प्रचारादरम्यान सर्वोच्च नैतिक मानकांचे पालन करण्याची जबाबदारी देखील पार पाडतात.

 

* * *

S.Patil/Sushma/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2010807) Visitor Counter : 313


Read this release in: Bengali , Odia , English , Urdu , Hindi