ऊर्जा मंत्रालय
महाराष्ट्रात नवीकरणीय ऊर्जा पार्कच्या विकासासाठी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि महाजेनको यांच्यात करार
Posted On:
28 FEB 2024 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2024
महाराष्ट्रात नवीकरणीय ऊर्जा पार्कच्या विकासासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) आणि महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) यांच्यातील करारावर आज नवी दिल्लीतील एनटीपीसी मुख्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या संयुक्त उपक्रमांतर्गत स्थापन होणारी कंपनी गिगाव्हॅट क्षमतेची नवीकरणीय ऊर्जा पार्क विकसित करेल. टप्प्याटप्प्याने ही कंपनी या श्रेणीचे प्रकल्प हाती घेईल. हा करार एनटीपीसीच्या हरित ऊर्जा उद्दिष्टांवर बेतलेला असून ऊर्जा संक्रमणासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे.
अंदाजे 74 गिगाव्हॅट क्षमतेसह एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी आहे. या कंपनीत संयुक्त कंपन्या आणि उपकंपन्यांचा समावेश आहे.
2032 पर्यंत 60 गिगाव्हॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठण्यासाठी एनटीपीसी समूहाने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या डिकार्बनायझेशनच्या उद्दिष्टांप्रति एनटीपीसी वचनबद्ध आहे.
महाजेनकोची स्थापित क्षमता सुमारे 13,170 मेगावॅट आहे. त्यात 9,540 मेगावॅट औष्णिक, 2,580 मेगाव्हॅट जलविद्युत, 672 मेगावॅट गॅस आणि 378 मेगावॅट सौर-आधारित ऊर्जा प्रकल्पाची क्षमता आहे.
* * *
S.Kane/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009911)
Visitor Counter : 124