महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने उद्या नवी दिल्ली येथे “पोषण उत्सव – सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन” या कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 28 FEB 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2024

 

महिला आणि बाल विकास मंत्रालय पोषण  उत्सवाचे आयोजन करत आहे, याद्वारे कार्टून कोलिशनच्या माध्यमातून चांगल्या पोषणमूल्यांच्या महत्त्वपूर्ण संदेशाचा प्रचार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.या संदर्भात, उद्या नवी दिल्ली येथे एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्यात 'पोषण उत्सव पुस्तक' प्रकाशित केले जाईल आणि  कार्टून कोलिशन महिला आणि बाल विकास विभागाच्या सहकार्याने पोषणासाठी आपला  पाठिंबा जाहीर करेल.

या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष  बिल गेट्स,महिला आणि बाल विकास विभागातील तसेच इतर मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि मुलांमध्ये निरोगी जीवनशैलीचा विकास करण्याच्या प्रयत्नांसाठी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल. मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टून  पात्रांद्वारे  माहिती, शिक्षण आणि संपर्क सामग्रीच्या मदतीने चित्ताकर्षक गोष्टींमध्ये  गुंतवून पोषण जागृतीमध्ये क्रांती घडवून आणणे आणि पौष्टिक आहाराच्या इच्छित परिणामांसाठी देशभरातील समुदायांमध्ये सकारात्मक वर्तन बदल घडवून आणणे या उपक्रमात अपेक्षित आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि अमर चित्र कथा यांच्या सहकार्यातून मुलांमध्ये सर्वांगीण पोषणाचे महत्व पटवून देण्यासाठी लोकप्रिय कार्टूनमधील पात्रांचा लाभ घेण्याचा पोषण उत्सवाचा हेतू आहे.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2009805) Visitor Counter : 111