कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
अनुभव विजेत्यांचे मनोगत” या मासिक वेबिनार मालिकेचा 16 भाग सादर
27 वक्त्यांनी‘अनुभव विजेत्यांचे मनोगत’ या मासिक वेबिनार मालिकेच्या सोळाव्या भागात त्यांचे सुरुवातीपासूनचे अनुभव केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2024 9:38AM by PIB Mumbai
अनुभव पुरस्कार योजना ही भारताच्या प्रशासकीय इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या ‘अनुभव पोर्टल’ वर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे करिअर अनुभव सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरित करण्याचे कार्य करते. 2015 पासून आजपर्यंत 54 अनुभव पुरस्कार आणि 09 ज्युरी प्रमाणपत्रे याअंतर्गत प्रदान करण्यात आले आहेत.
सध्या काम करत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये वचनबद्धता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी,कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाने (DOPPW) नोव्हेंबर 2022 मध्ये मासिक देशव्यापी वेबिनार मालिका- “अनुभव अवॉर्डीज स्पीक” सुरू केली आहे. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे,अशा अनुभव पुरस्कार विजेत्यांशी होणारा संवाद केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करेल अशी संकल्पना यामागे आहे.
आतापर्यंत,अशा सोळा वेबिनार आयोजित केल्या गेल्या आहेत आणि विविध पार्श्वभूमी आणि अनुभव असलेल्या 27 वक्त्यांनी आतापर्यंत सहभागींशी संवाद साधला. या वेबिनार मालिकेत देशभरातील 500 पेक्षा अधिक ठिकाणांहून कर्मचारी यांत सहभागी झाले आहेत.
27 फेब्रुवारी 2024 रोजी सोळावी वेबिनार आयोजित करण्यात आली.श्री शशी कुमार वलियाथन,संचालक (निवृत्त), GoI [अनुभव ज्युरी प्रमाणपत्र विजेता, 2023]यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनुभव सामायिक केले.यावेळी त्यांनी राष्ट्र उभारणीत आवश्यक लोकसेवेची भावना अधोरेखित केली. सरकारी सेवेचे पद हे विशेषाधिकार आणि विश्वासाचे आहे, सत्तेचे नाही,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्यांनी सहभागींना प्रत्येक नेमून दिलेले प्रत्येक काम सुयोग्य समजण्याचे आवाहन केले आणि कठोर परिश्रम हेच त्यांचे बक्षीस असल्याचे मत व्यक्त केले
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2009679)
आगंतुक पटल : 107