दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विमर्श 2023: कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी 5G हॅकेथॉन
Posted On:
24 FEB 2024 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
दूरसंचार विभागाच्या SRI युनिट अंतर्गत येणाऱ्या टेलिकॉम सेंटर्स ऑफ एक्सलन्स इंडियाने गृह मंत्रालयाच्या पोलिस संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने विमर्श 2023: 5G हॅकेथॉन आयोजित केली होती. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि संस्थेसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, संस्थेसमोरील आव्हानांवर तोडगा शोधणे तसेच या क्षेत्रात नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, हे या हॅकेथॉनचे उद्दिष्ट आहे.
21 आणि 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित स्क्रीनिंगच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा भाग म्हणून, 23 पैकी 22 स्टार्टअप आणि संस्थांनी दूरसंचार विभागामार्फत अनुदानित आयआयटी मद्रास मधील 5G टेस्टबेड येथे यूज केस प्रूफ ऑफ कन्सेप्ट्स (PoC) सादर केले. माननीय ज्युरी सदस्यांच्या प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थितीत ही प्रात्यक्षिके झाली.
ज्युरीने स्वयंचलित ड्रोनचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि ऑगमेंटेड रिॲलिटी अर्थात आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तव (AR/VR) संबंधित प्रकरणे, निगराणी ठेवणे आणि तपास, पुरावे संकलन, आपत्कालीन प्रतिसाद, बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, 5G मेटाडेटा विश्लेषण, जिओ फेन्सिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर एफआयआर दाखल करणे इत्यादी सुविधांचे मूल्यांकन केले. याचे अधिक तपशील Vimarsh 5G Hackathon 2023 (tcoe.in) येथे उपलब्ध आहेत. यातून उपलब्ध झालेल्या परिणामकारक उपायांमध्ये ड्रोन आधारित निगराणी ठेवणे, सुरक्षितता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर एफआयआर दाखल करणे, गुन्ह्याच्या घटना तपासासाठी जिओ फेन्सिंग पर्याय, गुन्ह्यांचे दृश्य पुनर्स्थापित करुन संवर्धित वास्तव आधारित प्रशिक्षण आणि प्रेडिक्टिव पोलिसिंगसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा विश्लेषण आणि डेटा प्रोसेसिंग ऍप इत्यादींचा समावेश होतो.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2008663)
Visitor Counter : 85