संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एडनच्या आखातात तैनात भारतीय नौदलाच्या विनाशिकेने एमव्ही आयलँडर या संकटग्रस्त मालवाहू जहाजाला पुरवले आपत्कालीन सहाय्य

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2024 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2024   

 

पलाउ या द्वीप-देशाच्या एमव्ही आयलँडर या जहाजावर 22 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या ड्रोन/क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर या जहाजावर आग लागली. यावेळी जहाजावरील कर्मचार्‍यांनी मदतीसाठी दिलेल्या हाकेला त्वरित प्रतिसाद देत, एडनच्या आखातात सागरी सुरक्षेसाठी तैनात असलेली भारतीय नौदलाची विनाशक युद्ध नौका, 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी संकटग्रस्त जहाजाच्या परिसरात पोहोचली.    

भारतीय नौदलाच्या ईओडी, अर्थात स्फोटक शस्त्रास्त्रांची विल्हेवाट लावणाऱ्या तज्ञांनी संकटग्रस्त जहाजावरील आग विझवली आणि पुढील धोका टाळण्यासाठी त्याचे निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर ते जहाज आपल्या पुढील प्रवासाकरता सज्ज झाले.

संकटग्रस्त जहाजाच्या कप्तानाच्या विनंतीवरून भारतीय नौदलाच्या वैद्यकीय पथकाने जहाजावरील जखमींना औषधोपचार पुरवले.

भारतीय नौदलाच्या जहाजांचे अथक परिश्रम हे, व्यापारी जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षीततेप्रति भारतीय नौदलाच्या दृढ वचनबद्धतेची साक्ष देणारे आहेत.

 

* * *

M.Pange/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2008614) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी