गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सरकारने नक्षलवाद प्रभावित प्रदेशांमध्ये विकास आणि सुरक्षिततेसाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून नक्षलवादाला दिला जोरदार झटका -अमित शाह


नक्षलवादाविरोधात केलेल्या तीव्र कारवाईच्या परिणामी आज नक्षलवाद शेवटचा श्वास घेत आहे : अमित शाह

Posted On: 23 FEB 2024 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 23  फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाला चाप लावण्यासाठी  आक्रमक धोरण अवलंबले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. X वरील पोस्टच्या मालिकेत,अमित शाह म्हणाले की, नक्षलवादाला चाप लावण्यासाठी केलेल्या तीव्र कारवाईच्या परिणामस्वरुप आज नक्षलवाद  शेवटचा श्वास घेत आहे.  मोदी सरकारने पुरेशा आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची उभारणी करून नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या गरिबांची मने जिंकली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे नक्षलवादाची  जन्मभूमी नष्ट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सरकारने नक्षलवाद प्रभावित प्रदेशांमध्ये विकास आणि सुरक्षिततेसाठी सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून नक्षलवादाला जोरदार झटका दिला आहे, असे शाह यांनी सांगितले. मोदी सरकारने सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारांना सोबत घेऊन जनतेचा विश्वास जिंकला असल्याचे ते म्हणाले.

गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2004-14 च्या तुलनेत 2014-23 या दशकात नक्षलवादाशी संबंधित हिंसाचारात 52 टक्के  घट झाली असून मृत्यूची संख्या 69 टक्क्यांनी म्हणजेच  6035 वरून 1868 पर्यंत कमी झाली आहे. त्याचप्रमाणे नक्षलवादाशी संबंधित  घटना 14,862 वरून 7,128 पर्यंत कमी झाल्या आहेत. नक्षलवादामुळे सुरक्षा दलातील जवानांच्या मृत्यूची संख्या 2004-14 मधील 1750 वरून 2014-23 मध्ये 72 टक्क्यांनी घटून 485 वर आली आहे आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या 4285 वरून1383 पर्यंत 68 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे, 2010 मध्ये हिंसाचारग्रस्त   जिल्ह्यांची संख्या 96 होती, जी 2022 मध्ये 53 टक्क्यांनी घसरून 45 झाली. यासोबतच हिंसाचाराची तक्रार नोंदवण्यात येणाऱ्या पोलिस ठाण्यांची संख्या 2010 मधील 465 वरून 2022 मध्ये 176 वर आली आहे.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2008549) Visitor Counter : 103


Read this release in: English , Urdu , Gujarati , Tamil