संरक्षण मंत्रालय
नवी दिल्लीत संरक्षण मंत्री आणि नेदरलँडचे संरक्षण मंत्री यांच्यातील बैठकीदरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा
Posted On:
23 FEB 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 23 फेब्रुवारी 2024
नवी दिल्लीत 23 फेब्रुवारी 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्री काजसा ओलोन्ग्रेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. उभय मंत्र्यांनी विशेषत: सागरी आणि औद्योगिक क्षेत्रात द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या संधींवर चर्चा केली. दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान वाढलेल्या परस्पर सहकार्याची दखल घेतली आणि हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली.
भारतीय विक्रेत्यांसोबत त्यांच्या पुरवठा साखळीत एकीकृत करण्यासाठी नेदरलँडच्या मूळ उपकरणे उत्पादकांना प्रोत्साहित केले जाऊ शकते, असे संरक्षण मंत्र्यांनी सुचवले. भारताने एक सचेत नवोन्मेष आणि औद्योगिक व्यवस्था विकसित केली आहे, असे ते म्हणाले. कौशल्य, तंत्रज्ञान आणि व्याप्तीमधील भारतीय आणि नेदरलँडची भागीदारी लक्षात घेऊन , संरक्षण उद्योग आणि सेमी-कंडक्टर आणि स्वच्छ ऊर्जा या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अधिक परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली.
नेदरलँडच्या संरक्षण मंत्री नवी दिल्लीत रायसिना संवादात सहभागी होत आहेत.
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2008397)
Visitor Counter : 125