शिक्षण मंत्रालय
अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेचा 68 वा वर्धापन दिन आणि 18 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उद्घाटनपर भाषण
2027 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत सज्ज होत असून यातून असंख्य संधी उपलब्ध होतील : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
Posted On:
21 FEB 2024 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024
एआयएमए अर्थात अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेचा 68 वा वर्धापनदिन आणि 18 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबोधित केले. व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्टता, समाजसेवा आणि वैचारिक नेतृत्वासाठी पारितोषिक मिळवलेल्या सर्व प्रतिष्ठित उद्योजकांचे त्यांनी अभिनंदन केले.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की सामुहिक सुज्ञपणाचा वापर राष्ट्र उभारणीसाठी झाला पाहिजे आणि तो पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित देखील केला गेला पाहिजे. वर्ष 2027 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी भारत सज्ज होत असून यातून असंख्य संधी निर्माण होणार आहेत.
या संधीची दारे उघडण्यासाठी आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक सामुहिक आराखडा तयार करणे हे आव्हान आपल्यासमोर असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की येत्या 25 वर्षांत, भारताची घोडदौड कोणीही थांबवू शकणार नाही. भारतातील शिक्षणापासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता उदयाला येईल. एआयएमए सारख्या प्रमुख संस्थांना त्यांची भूमिका नव्याने निश्चित करावी लागेल तसेच भारताची संपूर्ण क्षमता खुली करण्यासाठी लोकांना त्यांच्या ध्येयांच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासह आणि प्रक्रियाविषयीच्या कल्पना नव्याने मांडाव्या लागतील असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की संपत्ती निर्मिती करताना आपण जबाबदार व्यवसाय आणि लोक कल्याण यांच्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2007861)
Visitor Counter : 109