श्रम आणि रोजगार मंत्रालय
वेतनपट माहिती : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये डिसेंबर 2023 महिन्यात एकूण 15.62 लाख सदस्यांची भर
डिसेंबर 2023 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये 8.41 लाख नवीन सदस्यांची झाली नोंदणी
Posted On:
20 FEB 2024 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2024
20 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO)तात्पुरत्या वेतनश्रेणीची आकडेवारी ठळकपणे दर्शवते की, इपीएओने डिसेंबर 2023 मध्ये 15.62 लाख निव्वळ सदस्य जोडले आहेत. हा आकडा गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक आहे. मागील महिन्याच्या म्हणजे - नोव्हेंबर 2023 च्या डिसेंबर 23 मध्ये 11.97% ची निव्वळ सदस्य वाढ नोंदवली गेली आहे.
वर्ष दर वर्षीचे विश्लेषण केल्यास डिसेंबर 2022 च्या तुलनेत निव्वळ सदस्य जोडणीमध्ये 4.62% वाढ दिसून येते.
डिसेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार सुमारे 8.41 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. हा आकडा मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक आहे. या आकडेवारीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे 18-25 वयोगटाचे वर्चस्व हे आहे.
वेतनपट आकडेवारीचे लिंग-निहाय विश्लेषण हे दर्शवते की, 8.41 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.09 लाख नवीन महिला सदस्य आहेत. हा आकडा गेल्या तीन महिन्यांतील महिला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक नोंदवलेली वाढ दर्शवितो. वेतनश्रेणी आकडेवारीचे राज्य-निहाय विश्लेषण असे दर्शविते की महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि हरियाणा या 5 राज्यांमध्ये निव्वळ सदस्य वाढ सर्वाधिक आहे. या महिन्यात 21.63% निव्वळ सभासद जोडून महाराष्ट्र आघाडीवर आहे.
S.Bedekar/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2007466)