अर्थ मंत्रालय
केंद्र सरकार सोळाव्या वित्त आयोगामध्येडॉ निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी सदस्याची नियुक्ती करणार
Posted On:
19 FEB 2024 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2024
अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक, डॉ. निरंजन राजाध्यक्ष, यांची 31.01.2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र डॉ. राजाध्यक्ष यांनी अनपेक्षित वैयक्तिक कारणामुळे ही जबाबदारी स्वीकारण्यात आपण असमर्थ असल्याचे सांगितले.
त्यामुळे 16 व्या वित्त आयोगामध्ये डॉ. राजाध्यक्ष यांच्या जागी सदस्याची नियुक्ती करण्याची कार्यवाही केली जाईल.
* * *
S.Kakade/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007148)
Visitor Counter : 266