नौवहन मंत्रालय

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतीय बंदर कामगिरी निर्देशांकासाठी ‘सागर आंकलन’ मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Posted On: 16 FEB 2024 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी  जागतिक सागरी भारत शिखर परिषद 2023 मध्ये यापूर्वी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसाठी आज भागधारकांच्या बैठकीत ‘सागर आंकलन’ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

भारतीय बंदरांच्या कामगिरी संदर्भात राष्ट्रीय मापदंड प्रस्थापित करण्यासाठीचे "सागर आंकलन" मार्गदर्शक तत्त्वे भारतीय बंदरांचे मॅपिंग आणि बेंचमार्किंग - लॉजिस्टिक कार्यप्रदर्शन आणि कार्यक्षमता, मानकां संबंधी सुसंवाद, व्याख्या आणि जागतिक बेंचमार्कसह कार्यप्रदर्शन, सुधारणा, उत्पादकता, टिकाऊपणा आणि ग्राहक समाधान यावर लक्ष केंद्रित करून बंदर क्षेत्राची स्पर्धात्मकता, कार्यक्षमता आणि एकूण कामगिरीत सुधारणा साध्य करण्याच्या उद्देशाने सर्व भारतीय बंदरांना लागू असतील.

मंत्रालयाने जागतिक सागरी भारत शिखर परिषददरम्यान स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या जलद अंमलबजावणीसाठी कृती आराखडा देखील तयार केला आहे.

  

यावेळी सहभागी भागधारकांनी आपल्या समोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि सामंजस्य करारांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी मौल्यवान विचारांचे आदानप्रदान केले आणि शिफारसी सामायिक केल्या.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी या करारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि भारतीय सागरी क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यासाठी भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, " या अमृत काळात भारताला 'विकसित भारत' बनवण्याच्या या प्रवासात प्रत्येकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे."

 

* * *

S.Kane/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006673) Visitor Counter : 62


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu