कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीवरील (सीपीजीआरएएमएस) केंद्रीय मंत्रालये/विभागाच्या कामगिरीचा जानेवारी, 2024 चा 21 वा अहवाल प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाद्वारे प्रकाशित
Posted On:
15 FEB 2024 7:06PM by PIB Mumbai
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) जानेवारी, 2024 साठी केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली वरील (सीपीजीआरएएमएस) मासिक अहवाल प्रकाशित केला आहे. सार्वजनिक तक्रारींचे प्रकार आणि श्रेण्यांचे तपशीलवार विश्लेषण आणि निराकरणाचे स्वरूप या अहवालाच्या माध्यमातून प्रदान करण्यात येते. डीएआरपीजीद्वारे प्रकाशित केंद्रीय मंत्रालये/विभागांवरील हा 21 वा अहवाल आहे. या अहवालानुसार जानेवारी, 2024 मधील प्रगती दर्शवते की , केंद्रीय मंत्रालये/विभागांनी 1,21,478 तक्रारींचे निवारण केले. केंद्रीय सचिवालयात सलग 18व्या महिन्यात तक्रारी निकाली काढण्याची 1 लाख प्रकरणे ओलांडली आहेत. जानेवारी 2024 महीन्यासाठी केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये तक्रार निकाली काढण्याची सरासरी वेळ 16 दिवस आहे.
जानेवारी 2024 मध्ये, बीएसएनएल अभिप्राय कॉल सेंटरने 91437 अभिप्राय संकलित केले.संकलित केलेल्या एकूण अभिप्रायांपैकी, ~ 41% नागरिकांनी त्यांच्या संबंधित तक्रारींचे निराकरण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.बीएसएनएल अभिप्राय कॉल सेंटरद्वारे केंद्रीय मंत्रालये/विभागांसाठी 57217 अभिप्राय (62%) संकलित करण्यात आले, ~44% नागरिकांनी निराकरण झालेल्या तक्रारींबाबत समाधान व्यक्त केले.
2 जानेवारी 2024 पासून, डीएआरपीजीने “नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी डेटा-आधारित नवोन्मेष ” या विषयावर 5 समस्या उपायांसह एक ऑनलाइन हॅकेथॉन सुरू केली आहे जी विद्यार्थी/संशोधन अभ्यासक/स्टार्ट-अपसाठी खुली आहे. [दुवा : https://t.co/KaaGTYIvab].
डीएआरपीजीने डेटा-आधारित उपाय वापरून नागरिकांच्या तक्रारी निवारणाशी संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी ऑनलाइन हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सहभागी संघ डीएआरपीजीद्वारे परिभाषित केलेल्या एक किंवा त्याहून अधिक समस्यांवर मात करण्यासाठी उपाय शोधू शकतात आणि प्रत्येक समस्येसाठी निर्दिष्ट केल्यानुसार नाविन्यपूर्ण उपाय आणि सेवा सादर करू शकतात.
अव्वल 3 सर्वात नाविन्यपूर्ण उपायांना खालील बक्षिसे दिली जातील:
• सर्वात नाविन्यपूर्ण डेटा-आधारित उपायांसाठी रु. 2 लाख
• दुसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा-आधारित उपायासाठी रु. 1 लाख
• तिसऱ्या सर्वात नाविन्यपूर्ण डेटा-आधारित उपायासाठी रु. 50 हजार
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006432)