पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कतारचे विद्यमान अमीर यांचे पिता फादर अमीर यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
15 FEB 2024 5:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी दोहा येथे फादर अमीर (विद्यमान अमिर यांचे पिता) हमद बिन खलिफा अल थानी यांची भेट घेतली.
गेल्या दशकात कतारच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या फादर अमीर यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत- कतार संबंधांबाबत चर्चा केली.
प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींबाबत फादर अमीर यांनी व्यक्त केलेल्या अनुभवी निरीक्षणांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
भारत आणि कतार यांच्या दरम्यान असलेला अतूट बंध म्हणजे परस्पर विश्वास आणि सहकार्य यांचे प्रतीक आहे असे फादर अमीर म्हणाले. कतारच्या विकासात तसेच द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यात भारतीय समुदायाने बजावलेल्या भूमिकेची देखील त्यांनी प्रशंसा केली.
***
M.Iyengar/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2006383)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam