ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील उर्जा क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जे तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे, ज्याची मागणी सतत वाढतच जाणारी आहे


विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वीज क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील: ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 11 FEB 2024 7:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची आणि ऊर्जा क्षेत्राची सध्या होत असलेली आणि आगामी वर्षांमध्ये होणारी वेगवान वाढ लक्षात घेता भारतातील ऊर्जा क्षेत्र हे गुंतवणुकीसाठी प्राधान्याचे क्षेत्र राहणार आहे. आपल्यासारखी मोठी आणि प्रचंड क्षमता असणारी अर्थव्यवस्था दुसरी कोणतीही नाही. आणि आपल्याला आगेकूच करण्यासाठी  वीज  क्षेत्राची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. 2014- 15 च्या तुलनेत वीज निर्मिती आणि वीज वापरामध्ये 60% वाढ झाली आहे. विजेचा दरडोई वापर जवळपास तेवढाच वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या क्षेत्रात आपण 8% ची वाढ नोंदवलेली आहे. आणि म्हणूनच, हे एक असे क्षेत्र आहे जे  तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. ऊर्जेची मागणी सतत वाढतच राहणार आहे आणि मागणीनुसार पुरवठा कायम राहील हे सुनिश्चित करणे हे आपल्या समोरील आव्हान आहे.

टाइम्स समूहाने 10 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट अर्थात जागतिक व्यवसाय परिषदेमधील द ग्लोबल एनर्जी अजेंडा: अ लूक इन शेपिंग टुमॉरोज एनर्जी लँडस्केपया विषयावरील उद्घाटन सत्रात केंद्रीय मंत्री आर के सिंह बोलत होते.

केंद्रीय मंत्री सिंह यांनी स्पष्ट केले की, सरकारने वीज पुरवठादार कंपन्यांसाठी स्वयंचलित पेमेंट यंत्रणेसह संपूर्ण प्रणाली पारदर्शक केली आहे. "

ऊर्जा मंत्री म्हणाले की, सरकारनेही या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले असून हे क्षेत्र अधिकच वाढत जाणारे क्षेत्र आहे.

मंत्री म्हणाले की, भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढ ही जगात सर्वात जलद गतीने होणारी वाढ आहे. गैर-जीवाश्म-इंधन क्षमता आधीच एकूण उर्जा क्षमतेच्या 44% झालेली आहे. आपण आपली एनडीसी अर्थात राष्ट्रीय निर्धारित योगदाना संबंधित वचनबद्धता आधीच पूर्ण केली आहे आणि आता, 2030 पर्यंत एकूण ऊर्जा क्षमतेच्या 50% पर्यंतची ऊर्जा ही गैर-जीवाश्म-इंधन स्रोतांपासून उपलब्ध करण्यासंबंधीची आपली असलेली वचनबद्धता पार करू अशी अपेक्षा आहे; तोपर्यंत आपल्याकडे 65% एवढी ऊर्जा क्षमता ही गैर-जीवाश्म-इंधन स्त्रोतांकडून उपलब्ध होईल.

मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले की भारताची ऊर्जा पारेषण प्रणाली नियम, कार्यपद्धती, कनेक्टिव्हिटी आणि वेग या बाबतीत जगातील इतर कोणत्याही ट्रान्समिशन (पारेषण) प्रणालीपेक्षा खूप  प्रगत आहे. आपला असा एकमेव देश आहोत ज्याने सामान्य नेटवर्क ऍक्सेस पद्धती अंमलात आणली आहे. आपण अगदी जलद आणि सुलभ पद्धतीने कनेक्टिव्हिटी बहाल करतो. जगातील इतर कोणतीही पारेषण प्रणाली त्याची बरोबरी करू शकत नाही. भारताने ज्या गतीने आपली पारेषण क्षमता वाढवली आहे त्याबाबतीत जगातील अन्य कोणताही देश बरोबरी करू शकत नाही, असेही मंत्री म्हणाले.

ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट सत्र येथे पाहता येईल.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2005116) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu