नौवहन मंत्रालय
वर्ष 2047 पर्यंत होणारी भव्य बंदरांची उभारणी
Posted On:
09 FEB 2024 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
वर्ष 2047 पर्यंत देशभरात सहा बंदर समूह विकसित करण्यात येणार असून त्यापैकी कोचीन-विझींजम बंदर समूह, गलाठीया-दक्षिण आखात बंदर, चेन्नई-कामराजर-कुड्डलोरे बंदर समूह, पारादीप हे 300 दशलक्षाहून अधिक वार्षिक क्षमता (एमटीपीए) असलेले चार बंदर समूह आणि कमी महत्त्वाचे इतर बंदर समूह तसेच 500 एमटीपीएहून अधिक वार्षिक क्षमता असलेले दीनदयाळ आणि ट्युना टेकरा बंदर समूह व जवाहरलाल नेहरू-वाढवण बंदर समूह यांचा त्यात समावेश होतो. प्रमुख बंदरांतर्फे क्षमता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हाती घेण्यात येत असलेल्या उपक्रमांचा समावेश सागरी अमृतकाल संकल्पना, 2047 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सरकारी आणि खासगी भागीदारी (पीपीपी)तत्वावर तसेच अंतर्गत स्त्रोतांच्या माध्यमातून देखील प्रमुख बंदरांच्या पायाभूत सुविधा वाढवणे आणि क्षमता वाढवणे यासाठीची कामे पूर्वीच सुरु करण्यात आली आहेत.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004720)
Visitor Counter : 97