युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
2023-24 मध्ये खेलो इंडिया क्रीडापटूंना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 30.83 कोटींहून अधिक रक्कम जारी
Posted On:
08 FEB 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत 2571 खेलो इंडिया क्रीडापटूंना 7,71,30,000 रुपयांचा भत्ता जारी केला आहे. ही रक्कम खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेचा एक भाग आहे.
खेलो इंडिया योजनेच्या दीर्घकालीन विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, जवळपास 3000 क्रीडापटूंना खेलो इंडिया क्रीडापटू म्हणून निश्चित केले असून प्रत्येक क्रीडापटूला वार्षिक 1,20,000/- इतका अतिरिक्त भत्ता दिला जातो. याशिवाय, प्रशिक्षणासाठी आणि स्पर्धेसाठी प्रत्येक क्रीडापटूवर 5 लाख रुपये खर्च केले जातात.
2023-24 साठी जारी केलेल्या चौथ्या तिमाहीची रक्कम जानेवारी - फेब्रुवारी - मार्च 2024 या कालावधीसाठी असून 2023-24 च्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत क्रीडापटूंना प्रदान केलेली संपूर्ण रक्कम 30,83,30,000 रुपये इतकी आहे.
खेलो इंडिया योजनेचा भाग असलेल्या जवळपास 3000 प्रतिभावान क्रीडापटूंना त्यांच्या प्रशिक्षण, कोचिंग, आहार, क्रीडा साहित्य, वैद्यकीय विमा आणि अतिरिक्त भत्ता यासाठी एकूण 6.28 लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
खेलो इंडिया क्रीडापटूंना (KIAs) 2023-24 साठी प्रदान केलेली रक्कम:
पहिली तिमाही - 2848 क्रीडापटू - 7,36,70,000 रुपये
दुसरी तिमाही - 2684 क्रीडापटू - 7,81,10,000 रुपये
तिसरी तिमाही - 2663 क्रीडापटू - 7,94,20,000 रुपये
चौथी तिमाही - 2571 क्रीडापटू - 7,71,30,000 रुपये
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004168)
Visitor Counter : 78