वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये गुणवत्ता महत्त्वाची : केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल


भारतीय ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा अभिप्रेत: गोयल

Posted On: 07 FEB 2024 8:50PM by PIB Mumbai

 
नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

 


जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये भारतीय गुणवत्ता परिषद (क्युसीआय) द्वारे आयोजित ‘दर्जेदार भारतासाठी युवा महोत्सव 2024’ मधील संबोधनात, त्यांनी विश्वास व्यक्त केला की हा महोत्सव देशातील तरुणांमध्ये गुणवत्तेची संस्कृती रुजवेल.

आपण सर्वांनी गुणवत्तेबाबत जागरुक राहून प्रत्येक गोष्टीत गुणवत्तापूर्ण संस्कृती रुजवण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन करताना भारतीय ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा अभिप्रेत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केल्यानुसार शाश्वत विकासासाठी ‘झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट’ आवश्यक आहे कारण हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी गुणवत्तेची  जाणीव महत्त्वाची असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे अनमोल विचार मांडले. त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे सन्माननीय अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या  उपस्थितीने 2047 पर्यंत समृद्ध भारताच्या व्यापक उद्दिष्टाच्या अनुषंगाने बदल आणि विकासाचे प्रतिनिधी म्हणून तरुणांचे प्रबोधन करण्याची सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.

2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, क्युसीआय ने दर्जेदार भारतासाठी युवा महोत्सव (वायक्यूबीएफ) आयोजित केला. भारत मंडपम येथे आयोजित केलेला हा महत्त्वाचा कार्यक्रम - दर्जेदार पायाभूत सुविधांबाबत भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक - दर्जेदार भारत @100 अभियानाचा एक अविभाज्य भाग आहे, ज्याचा उद्देश 'गुणवत्तापूर्ण भारत, विकसित भारत' ला चालना देणे हा आहे.

या महोत्सवाने विद्यापीठांमधील 2,500 हून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता उत्सव  आणि भारताच्या भविष्याचे शिल्पकार बनण्यासाठी सक्षम केले. यात प्रेरणादायी चर्चा, प्रत्यक्ष सादरीकरण आणि दर्जेदार भारतासाठी युवा अभियानाच्या  व्हिडिओचा प्रारंभ  यांचा समावेश होता.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2003759) Visitor Counter : 96


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil