इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत 2047 च्या संकल्पनेअंतर्गत नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल म्हणून उद्योगांना स्मार्ट अन्नधान्य भंडारण व्यवस्थेचे हस्तांतरण

Posted On: 05 FEB 2024 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024

नवी दिल्लीत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, आय आय आय टी मध्ये डिजिटल भारत भविष्यातील प्रयोगशाळा (फ्यूचर लैब्स) कार्यक्रमादरम्यान, अचूक शोध घेण्यासाठी रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन असलेल्या धान्याच्या पिशव्यांचे वहन करण्यासाठी कन्व्हेयराइज्ड लोडिंग आणि अनलोडिंगचे तंत्रज्ञानइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय (मेइटी)च्या 'समीर' या संशोधन आणि विकास संस्थेने ऑनलाइन वजन आणि ओलावा मापन पद्धतीनुसार रेडिओ तरंगांचा वापर करून विकसित केलेली प्रणाली, इत्यादी गोष्टींचा समावेश असलेली स्मार्ट अन्नधान्य भंडारण व्यवस्था (SAFEETY) व्यवस्थेचे हस्तांतरण करण्यात आले. या प्रणालीचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी, हे तंत्रज्ञान मेसर्स पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये 40 मिनिटांत जवळपास एक ट्रक (अंदाजे वजन: 28 टन) धान्य हाताळण्याची क्षमताआहे.

तंत्रज्ञान हस्तांतरित दस्तऐवजांची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.  यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील संशोधन आणि विकास विभागाच्या गट समन्वयक सुनीता वर्मा, समीरचे महाव्यवस्थापक, समीरचे मुंबई येथील सीआय, राजेश हर्ष, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील  शास्त्रज्ञ  'डी', डॉ ओम कृष्ण सिंग, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज चे संचालक अमित महाजन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

स्मार्ट अन्नधान्य भंडारण व्यवस्थेचे उद्‌घाटन

माननीय राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर यांच्या  हस्ते SAFEETY प्रणालीचे प्रोटो मॉडेल, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज चे संचालक अमित महाजन यांच्याकडे हस्तांतरित

 

Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2002604) Visitor Counter : 88