पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारीला गोव्याला भेट देणार


पंतप्रधान करणार भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उदघाटन

जागतिक इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान साधणार संवाद

विकसित भारत, विकसित गोवा 2047 कार्यक्रमात पंतप्रधान 1,330 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोव्याच्या स्थायी संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उदघाटन

रोजगार मेळावा अंतर्गत पंतप्रधान सरकारी विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार

Posted On: 05 FEB 2024 11:04AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्याला भेट देणार आहेत. साधारण सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान ओ एन जी सी  सी सर्व्हायव्हल सेंटरचे उदघाटन करतील. पावणे आकाराच्या सुमारासपंतप्रधानांच्या हस्ते भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उदघाटन होणार आहे. त्यांनतर दुपारी  2:45 वाजताते विकसित भारतविकसित गोवा 2047 कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

भारत ऊर्जा सप्ताह 2024

ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या क्षेत्राला पंतप्रधानांचे प्राधान्य आहे. याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणजे गोवा इथे 6 – 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेला भारत ऊर्जा सप्ताह  2024. संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळी एकत्र आणणारे हे भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद असेल आणि भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी ते प्रेरणादायी ठरेल. पंतप्रधान, इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी गोलमेज परिषदेत संवाद साधतील. स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देऊन त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे आणि त्यांना ऊर्जा मूल्य साखळीत समाविष्ट करणे यावर भारत ऊर्जा सप्ताह 2024 चा अधिक भर असेल. यात जगभरातून 17 हून अधिक मंत्र्यांची उपस्थिती असेल. 35,000 हून अधिक प्रतिनिधी, 900 प्रदर्शक यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यात कॅनडाजर्मनीनेदरलँडरशियायूके आणि यूएसए असे सहा समर्पित कंट्री पॅव्हेलियन असतील. याशिवाय  भारतातील सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांची ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी दर्शवण्यासाठी एका  विशेष मेक इन इंडिया पॅव्हेलियनचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

विकसित भारत, विकसित गोवा 2047
गोव्यातील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 1330 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 
पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा या संस्थेच्या स्थायी परिसराचे राष्ट्रार्पण होणार आहे. नव्याने बांधलेल्या या परिसरामध्ये शिकवणी संकुल, विभागीय संकुल, चर्चासत्रासाठी संकुल, प्रशासकीय संकुल, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थान, सुविधा केंद्र, खेळाचे मैदान आणि संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर सुविधा आहेत.
राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या नवीन परिसराचे लोकार्पणही पंतप्रधान करणार आहेत. ही संस्था जलक्रीडा आणि पाण्यातून बचाव करण्याच्या उपक्रमांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक आणि सशस्त्र दलांसाठी 28 विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देईल. दक्षिण गोव्यात 100 टीपीडी एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. 60 टीपीडी ओला कचरा आणि 40 टीपीडी सुक्या कचऱ्याच्या वैज्ञानिक प्रक्रियेच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे तसेच अतिरिक्त वीज निर्माण करणारा 500 किलोवॅट वीज निर्मितीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा देखील यात समावेश आहे.
पणजी आणि रेइश मागूश यांना जोडणाऱ्या पर्यटन उपक्रमांसह प्रवासी रोपवेची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दक्षिण गोव्यात 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत.
याशिवाय, ते रोजगार मेळाव्या अंतर्गत विविध विभागांमधील 1930 नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण देखील करणार आहेत आणि विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना देखील मंजुरी पत्रे सुपूर्द करतील.

ओएनजीसी सागरी टिकाव (सी सर्व्हायव्हल) केंद्र
भारतीय सागरी टिकाव (सर्व्हायव्हल) प्रशिक्षण व्यवस्थेला जागतिक मानकांनुसार अत्याधुनिक करण्यासाठी ओएनजीसी सागरी सर्व्हायव्हल केंद्र हे एक प्रकारचे एकात्मिक सागरी शाश्वत प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 10,000-15,000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. सिम्युलेटेड आणि नियंत्रित तीव्र हवामानातील सराव प्रशिक्षणार्थींच्या समुद्रात टिकून राहण्याच्या कौशल्यांमध्ये वाढ करेल आणि त्यामुळे प्रत्यक्ष  जीवनातील आपत्तींपासून सुरक्षित बचाव करण्याच्या शक्यतांमध्ये वाढ करेल.

***

JPS/Bhakti /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2002503) Visitor Counter : 99