आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एम्स जोधपूरच्या चौथ्या दीक्षांत समारंभात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी बीजभाषण केले
डॉ. मनसुख मांडवीय यांनी एम्स बिलासपूर, ऋषिकेश, गोरखपूर, नागपूर, भुवनेश्वर, देवघर येथील 24 आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले आणि एम्स जोधपूरसाठी 68 आरोग्य सेवांची पायाभरणी केली.
Posted On:
03 FEB 2024 4:15PM by PIB Mumbai
सर्व रोगांवर अत्यावश्यक काळजी सेवा वेळेवर उपलब्ध झाली, तर आपत्कालीन परिस्थितीत अनेक जणांचे प्राण वाचू शकतील, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. ते आज राजस्थानमध्ये जोधपूर एम्स (AIIMS), अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या चौथ्या दीक्षांत समारंभात बीजभाषण देताना बोलत होते. त्यांनी यावेळी एम्स बिलासपूर, ऋषिकेश, गोरखपूर, नागपूर, भुवनेश्वर, देवघर येथील 24 आरोग्य सुविधांचे उद्घाटन केले आणि एम्स जोधपूरसाठी 68 आरोग्य सेवांची पायाभरणी केली.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिमसर, आणि राज्यसभेचे खासदार राजेंद्र गेहलोत यावेळी उपस्थित होते.

डॉ. मनसुख मांडवीय आणि भजनलाल शर्मा यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 5 उपआरोग्य केंद्रांचे आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान नागरी विभागाच्या 63 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये 7 आयुष्मान आरोग्य मंदिरे, निवासाची सुविधा असलेली 2 रुग्णालये, नव्याने बांधलेल्या MNC युनिट्ससह 3 रुग्णालये, नव्याने बांधलेली प्रसूती कक्ष असलेली 2 रुग्णालये, 4 जन औषधी केंद्रे, 3 नव्याने बांधलेल्या BPHU खोल्या, 42 उप-आरोग्य केंद्रे यांचा समावेश आहे. या प्रकल्पांना पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत निधी पुरवला जातो. प्रधान मंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्र-राज्य सामायिकरण तत्त्वावर जयपूरच्या S.M.S वैद्यकीय महाविद्यालयाची श्रेणी सुधारणा (अपग्रेडेशन) आणि लोकार्पण केले जाईल. यामध्ये कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरो-सर्जरी आणि मेडिकल जेरोन्टोलॉजी हे पाच विभाग असतील.


उद्घाटन करण्यात आलेल्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये नागपूर एम्समधील विशेष सुविधांचा समावेश आहे.
CSST सेवा, एम्स नागपूर शस्त्रक्रियेसाठी उपकरणे पुरवणार असून, स्किल लॅब आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकासासाठी काम करेल.

डॉ. मांडवीय यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करून त्यांच्या कामगिरीचा गौरव केला. या कार्यक्रमात वैद्यकीय, नर्सिंग पदवी पूर्व, पदवी पश्चात आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2002342)