संरक्षण मंत्रालय
संरक्षण दलातील नारी शक्ती
Posted On:
02 FEB 2024 3:37PM by PIB Mumbai
महिलांना सशस्त्र दलांमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकार आणि तिन्ही सेना दलांनी पुढील पावले उचलली आहेत:
(1) महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन (WOs)
- 12 सशस्त्र दल आणि सेवेतील महिला अधिकाऱ्यांना (लष्करी वैद्यकीय कोअर, लष्करी दंत वैद्यक कोअर आणि लष्करी परिचारिका सेवा, या सेवांसह) त्यांना ज्या ठिकाणी कमिशन करण्यात आले आहे, त्या सेवेत कायम स्वरूपी कमिशन (पीसी) प्रदान केले जात आहे.
- महिला अधिकाऱ्यांना मोहिमांवरील युद्धनौकांवर आणि भारतीय नौदलात विशेष नौदल हवाई कारवाई (NAO) अधिकारी म्हणून नियुक्त केले जात आहे.
- भारतीय हवाई दलाने 2015 मध्ये महिला अधिकाऱ्यांना सर्व लढाऊ भूमिकांमध्ये समाविष्ट करण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली होती. 2022 मध्ये त्याला कायम स्वरूपी योजना म्हणून लागू करण्यात आले.
(2) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये महिला कॅडेट्स
संरक्षण दलाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये महिला उमेदवारांसाठी प्रवेश खुला केला आहे. महिला कॅडेट्सच्या पहिल्या, दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या तुकडीचे अनुक्रमे जुलै 2022, जानेवारी 2023, जुलै 2023 आणि जानेवारी 2024 पासून एनडीए मध्ये प्रशिक्षण सुरू झाले. यासाठी संस्था सर्व आवश्यक प्रशासकीय, प्रशिक्षणात्मक आणि धोरणात्मक बदलांबाबत सर्वसमावेशक उपाययोजना करत आहे.
(3) कमांड नियुक्त्या
महिला अधिकाऱ्यांचा कर्नल (निवडक श्रेणी) या पदासाठी विचार केला जात असून, त्यांना कमांड (अधिकारी) पदावर नियुक्ती दिली जात आहे. महिला अधिकाऱ्यांचा कर्नल (सिलेक्ट ग्रेड) पदांसाठी विचार केला जात आहे आणि त्यांना कमांड नियुक्ती देण्यात येत आहे. बदलीच्या कालावधीत अनिवार्य व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्यांच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी काही सवलती देखील देण्यात आल्या आहेत.
(4) तिन्ही सेवांमध्ये अग्निवीर म्हणून महिलांचा प्रवेश सुरू झाला.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत व्ही के श्रीकांदन यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002079)
Visitor Counter : 143