आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

वैद्यकीय शिक्षणात साधलेली प्रगती


वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 82 टक्के वाढ, 2014 पूर्वीच्या 387 वरून आता ही संख्या 706 पर्यंत

एम. बी. बी. एस. च्या जागांच्या संख्येत 112% वाढ, 2014 पूर्वीच्या 51,348 वरून सध्याच्या 1,08,940 पर्यंत झेप

पदव्युत्तर पदांसाठीच्या जागांच्या संख्येत 127% वाढ, 2014 पूर्वीच्या 3,185 वरून वाढवून सध्या 70,645 पर्यंत प्रगती

मान्यताप्राप्त नवीन 157  वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 108 सध्या कार्यरत

22 पैकी 19 एम्स मध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांना सुरूवात

Posted On: 02 FEB 2024 3:11PM by PIB Mumbai

 

सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवली असून सोबतच एमबीबीएस/पीजीच्या जागाही वाढवल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 2014 पूर्वी 387 होती ती आता 82 टक्क्यांनी वाढून 706 झाली आहे. एम. बी. बी. एस. च्या जागांमध्ये 112% वाढ झाली आहे. 2014 पूर्वीच्या 51,348 वरून आता ती  1,08,940 वर पोहचली आहे. तसेच पदव्युत्तर जागांमध्ये 127% ची वाढ झाली आहे. 2014 पूर्वीच्या 31,185 वरून आता ती 70,645 झाली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, 'विद्यमान जिल्हा/स्थानिक आरोग्य केन्द्र रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी' केंद्र पुरस्कृत योजना (सी. एस. एस.) राबवते.  कमी सेवा असलेल्या भागांना आणि आकांक्षी जिल्ह्यांना यात प्राधान्य दिले जाते. जिथे सध्या सरकारी किंवा खाजगी वैद्यकीय महाविद्यालये नाहीत आणि ईशान्येतील आणि विशेष श्रेणी राज्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात 90:10 आणि इतरांसाठी 60:40 च्या प्रमाणात निधीची विभागणी केली जाते.

या योजनेअंतर्गत सर्व 157 वैद्यकीय महाविद्यालयांना तीन टप्प्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 108 वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत झाली आहेत. या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचा राज्यनिहाय आणि वर्षनिहाय तपशील तसेच गेल्या तीन वर्षांत या महाविद्यालयांना देण्यात आलेला निधी खालीलप्रमाणे आहेः

'विद्यमान जिल्हा/स्थानिक आरोग्य केन्द्र रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना' करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयांचा राज्यनिहाय तपशील

 

S.No

State/UT

No. of colleges

Districts

 

Phase-I (58)

 

1

A & N Islands

1

Port Blair

 

2

Arunachal Pradesh

1

Naharlagun

 

3

Assam

4

Dhubri, Nagaon, North Lakhimpur, Diphu

 

4

Bihar

3

Purnia, Saran (Chhapara), Samastipur

 

5

Chhattisgarh

2

Rajnandgaon, Sarguja

 

6

Himachal Pradesh

3

Chamba, Hamirpur, Nahan (Sirmour)

 

7

Haryana

1

Bhiwani

 

8

Jharkhand

3

Dumka, Hazaribagh, Palamu (Daltonganj)

 

9

Jammu & Kashmir

5

Anantnag, Baramulla, Rajouri, Doda, Kathua

 

10

Madhya Pradesh

7

Datia, Khandwa, Ratlam, Shahdol, Vidisha, Chindwara, Shivpuri

 

11

Maharashtra

1

Gondia

 

12

Meghalaya

1

West Garo Hills (Tura)

 

13

Mizoram

1

Falkawn

 

14

Nagaland

1

Naga Hospital (Kohima)

 

15

Odisha

5

Balasore, Baripada (Mayurbhanj), Bolangir, Koraput, Puri

 

16

Punjab

1

SAS Nagar

 

17

Rajasthan

7

Barmer, Bharatpur, Bhilwara, Churu, Dungarpur, Pali,  Sikar

 

18

Uttar Pradesh

5

Basti, Faizabad, Firozabad, Shahjahanpur, Bahraich

 

19

Uttarakhand

1

Almora

 

20

West Bengal

5

Birbhum (Rampur Hat), Cooch behar, Diamond harbour, Purulia, Raiganj (North Dinajpur)

 

Phase –II (24)

 

1

Bihar

5

Sitamarhi, Jhanjharpur, Siwan, Buxar, Jamui

 

2

Jharkhand

2

Koderma, Chaibasa (Singhbhum)

 

3

Madhya Pradesh

1

Satna

 

4

Odisha

1

Jajpur

 

5

Rajasthan

1

Dholpur

 

6

Uttar Pradesh

8

Etah, Hardoi, Pratapgarh, Fatehpur, Siddharthnagar (Domariyaganj), Deoria, Ghazipur, Mirzapur

 

7

West Bengal

5

Barasat, Uluberia, Arambagh, Jhargram, Tamluk

 

8

Sikkim

1

Gangtok

Phase-III (75)

1

Andhra Pradesh

3

Piduguralla, Paderu, Machilipatnam

2

Assam

1

Kokrajhar

3

Chhattisgarh

3

Korba, Mahasamund, Kanker

4

Gujarat

5

Narmada, Navsari, Panchmahal, Porbandar, Morbi

5

Jammu & Kashmir

2

Udhampur, Handwara (Distt. Kupwara)

6

Karnataka

4

Chikkamagaluru, Haveri, Yadgiri, Chikkaballapura

7

Ladakh

1

Leh

8

Madhya Pradesh

6

Rajgarh, Mandla, Neemuch, Mandsaur, Sheopur, Singrauli

9

Maharashtra

1

Nandurbar

10

Manipur

1

Churachandpur

11

Nagaland

1

Mon

12

Odisha

1

Kalahandi

13

Punjab

2

Kapurthala, Hoshiarpur

14

Rajasthan

15

Alwar, Baran, Bansawara, Chittorgarh, Jaisalmer, Karauli,

Nagaur, Shri Ganganagar, Sirohi, Bundi, SawaiMadhopur, Tonk, Hanumangarh, Jhunjhunu, Dausa

15

Uttarakhand

3

Rudrapur (Distt. Udham Singh Nagar), Pithoragarh, Haridwar

16

Uttar Pradesh

14

Bijnaur, Kushinagar, Sultanpur, Gonda, Lalitpur, LakhimpurKheri, Chandauli, Bulandshahar, Sonbhadra, Pilibhit, Auraiya, Kanpur Dehat, Kaushambi, Amethi

17

Tamil Nadu

11

Tiruppur, Nilgiris, Ramanathapuram, Namakkal, Dindigul,

Virudhunagar, Krishnagiri, Tiruvallur, Nagapattinam,

Ariyalur, Kallakurichi

18

West Bengal

1

Jalpaiguri

           

 

याव्यतिरिक्त, नवीन एम्स उभारण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत 22 एम्सना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 19 ठिकाणी पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001953) Visitor Counter : 51


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi