रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा दल 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान लखनौ येथे 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करणार


रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी समर्पित विशेष मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेबसाइटचे केले उद्घाटन

Posted On: 02 FEB 2024 12:40PM by PIB Mumbai

 

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 12 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लखनौ येथे 67 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा (एआयपीडीएम) आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी एआयपीडीएमच्या केंद्रीय समन्वय समितीने आरपीएफकडे सोपवली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वर्तुळात हा कार्यक्रम प्रसिद्ध असून, अंतर्गत सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, गुन्ह्यांचा वैज्ञानिक पद्धतीने शोध आणि तपास करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्टता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

आधुनिकीकरणाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल म्हणून, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी 67 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी आरपीएफच्या टेक ग्रुपने (तंत्रज्ञान गट) तयार केलेले समर्पित मोबाइल ॲप्लिकेशन आणि वेबसाइट चे उद्घाटन केले आहे.

67 वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र येऊन शिकण्याचे आणि गुन्ह्यांच्या तपासामधील  उत्कृष्टतेचा सामूहिक प्रयत्न मजबूत करण्याचे आवाहन करतो.

गुन्ह्यांच्या तपासासाठी वैज्ञानिक उपाय, पोलिस फोटोग्राफी, संगणक जागरूकता, विशेष कॅनाइन युनिट स्पर्धा, तोडफोड विरोधी तपासणी आणि पोलिस व्हिडिओग्राफी, यासारख्या विविध स्पर्धांचा समावेश असलेला, पोलीस कर्तव्य मेळावा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

1957 च्या आरपीएफ कायद्यांतर्गत स्थापन झालेले, रेल्वे सुरक्षा दल 2004 पासून रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण आणि प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा प्रदान करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की, आरपीएफ मध्ये महिलांचे 9% प्रतिनिधित्व असून, भारतातील सर्व सशस्त्र दलांमधील ही सर्वाधिक टक्केवारी आहे.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001946) Visitor Counter : 91


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi