संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाकडून 48वा वर्धापनदिन साजरा

Posted On: 01 FEB 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2024

 

भारतीय तटरक्षक दलाने(आयसीजी) आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्लीत आपला 48 वा वर्धापनदिन साजरा केला. 1977 मधील अगदी साध्या प्रारंभापासून सागरी सुरक्षेमधील एक महत्त्वाचे दल बनण्याच्या उल्लेखनीय प्रवासाचे स्मरण या निमित्ताने होत आहे. ताफ्यामधील 152 जहाजे आणि 78 विमानांसह भारतीय तटरक्षक दलाचे 2030 पर्यंत पृष्ठभागावरील 200 प्लॅटफॉर्म्स आणि 100 विमानांचा ताफा उभारण्याचे लक्ष्य आहे.   

“वयम रक्षामह” या ब्रीदवाक्यासह आयसीजीने त्याच्या प्रारंभापासून आतापर्यंत 11,554 जणांचा जीव वाचवला आहे. यामध्ये 2023 मधील 200 व्यक्तींचा समावेश आहे. सुरक्षा आणि सुरक्षितता याविषयीच्या बांधिलकीमुळे हे दल जागतिक पातळीवरील एक प्रसिद्ध दल बनले आहे.  

भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये 24x7 दक्षता राखून, आयसीजी. दररोज 50 ते 60 जहाजे आणि 10 ते 12 विमाने तैनात करते, ज्यामुळे नील अर्थव्यवस्थेच्या शाश्वत प्रगतीसाठी आणि सुरक्षित सागरी वाहतुकीसाठी मुक्त आणि सुरक्षित समुद्र सुनिश्चित करण्याच्या देशाच्या उद्दिष्टात योगदान दिले जात आहे.

'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत अभियान' मोहिमांच्या अग्रणी राहात, आयसीजीने स्वदेशी बनावटीची असंख्य जहाजे, विमाने आणि उपकरणे समाविष्ट केली आहेत. प्रदूषण नियंत्रण जहाजांसह (PCVs) 21 जहाजे निर्माणाधीन आहेत आणि विमानांची सध्या सुरू असलेली खरेदी, आय. सी. जी. त्याच्या परिचालन क्षमतांमध्ये सुधारणा करत आहे.

'डिजिटल सशस्त्र दल' बनण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल उचलत संरक्षण मंत्रालय आणि टीसीआयएल ने डिजिटल तटरक्षक (डी. सी. जी.) मोहिमेसाठी सरकारच्या कागदरहित कार्यालयाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा परिवर्तनात्मक करार केला आहे.

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2001693) Visitor Counter : 54


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil