संरक्षण मंत्रालय
पूर्वावलोकन
Y-3025 (संधायक’) चे जलावतरण
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
भारतीय नौदल 3 फेब्रुवारी 24 रोजी नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम येथे संधायक या अत्याधुनिक सर्वेक्षण जहाजाचे प्रमुख पाहुणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार व्हाइस, ॲडमिरल राजेश पेंढारकर, एफओसी-इन-सी इस्टर्न नेव्हल कमांड आणि वरिष्ठ नौदल अधिकारी आणि जीआरएसई अधिकाऱ्यांसह इतर मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत जलावतरण करण्यासाठी सज्ज आहे. मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (GRSE), कोलकाता येथे निर्माणाधीन चार सर्वेक्षण जहाजांपैकी पहिल्या (मोठ्या)सर्वेक्षण जहाजाचा नौदलात औपचारिक समावेश या कार्यक्रमात होणार आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाइन ब्युरोने या प्रकल्पाचे संचालन केले आहे.
5TME.JPG)
बंदर आणि समुद्रात कठोर आणि व्यापक चाचणी कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर 4 डिसेंबर 2023 रोजी संधायक भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. (https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1982484)
नौदलाच्या ताफ्यात एक महत्त्वाची भर पडलेले संधायक हे अत्याधुनिक हायड्रोग्राफिक उपकरणांसह सुसज्ज आहे ज्यामध्ये डीप आणि शॅलो वॉटर मल्टी-बीम इको-साउंडर्स, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल, रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल, साइड स्कॅन सोनार, डेटा ॲक्विझिशन आणि प्रोसेसिंग सिस्टीम , उपग्रह-आधारित पोझिशनिंग सिस्टम आणि स्थलीय सर्वेक्षण उपकरणे यांचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारताच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाचा पाठपुरावा करताना भारताच्या वाढत्या जहाजबांधणीच्या सामर्थ्याचा संधायक हे जहाज खरा दाखला आहे. अमृत कालच्या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत संधायक हे विकसित भारताचे खरे अग्रदूत आहे.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001648)
आगंतुक पटल : 132