राष्ट्रपती कार्यालय
उद्यान उत्सव 2024 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा
अमृत उद्यान उद्यापासून जनतेसाठी होणार खुले
Posted On:
01 FEB 2024 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (1 फेब्रुवारी, 2024) उद्यान उत्सव –I, 2024 ला भेट दिली.
उद्यान उत्सव-I निमित्ताने, अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 (देखभालीचा दिवस सोमवार वगळता) जनतेसाठी खुले राहणार आहे.
उद्यान विशेष श्रेणींतील नागरिकांसाठी पुढील दिवस खुले राहील:
- 22 फेब्रुवारी – दिव्यांग आणि दृष्टिहीन व्यक्तींसाठी
- 23 फेब्रुवारी – संरक्षण, निमलष्करी आणि पोलीस दलातील जवानांसाठी
- 1 मार्च – महिला, आदिवासी आणि महिला बचत गटांसाठी
- 5 मार्च – अनाथाश्रमातील मुलांसाठी
उद्यानाला भेट देण्यासाठी पुढील संकेतस्थळावर बुकिंग करावे लागणार आहे. https://visit.rashtrapatibhavan.gov.in तसेच गेट नं.35 च्या बाहेर लावण्यात आलेल्या ‘सेल्फ सर्व्हिस किऑस्क’द्वारेही बुकिंग करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश आणि निर्गमन सुविधा राष्ट्रपती भवनाच्या व्दार क्रमांक 35 वर ज्याठिकाणी नॉर्थ ॲव्हेन्यू मार्ग येउून मिळतो,त्या व्दारातून केली आहे.
अमृत उद्यानाव्यतिरिक्त, नागरिक आठवड्यातून सहा दिवस (मंगळवार ते रविवार) राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला देखील भेट देऊ शकतात. राजपत्रित सुटीचे दिवस वगळता दर शनिवारी चेंज-ऑफ-गार्ड समारंभासाठी उपस्थित राहू शकतात. अधिक तपशील या संकेतस्थळावर https://visit.rashtrapatibhavan.gov.in वर उपलब्ध आहेत.
उद्यान उत्सवादरम्यान शालेय विद्यार्थी संग्रहालयाला मोफत भेट देऊ शकतील.
* * *
S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001472)
Visitor Counter : 103