अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जानेवारी 2024 मध्ये 1,72,129 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन; गतवर्षापेक्षा महसूलात 10.4% ची वाढ


1,72,129 कोटी रुपये हे आत्तापर्यंतचे दुसरे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तिसऱ्यांदा ओलांडला 1.70 लाख कोटी रुपयांचा टप्पा

एकूण संकलन 16.69 लाख कोटींवर पोहोचल्यामुळे 10 महिन्यांच्या कालावधीतच जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.6% वाढ

Posted On: 31 JAN 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

जानेवारी, 2024 (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत) मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)महसूल संकलन 1,72,129 कोटी रुपये इतके झाले आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा 10.4% वाढ दर्शवते. जानेवारी 2023 मध्ये (31.01.2023 रोजी संध्याकाळी 5:00 पर्यंत) 1, 55,922 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक मासिक संकलन आहे आणि या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा 1.70 लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संकलन झाले आहे. सरकारने आयजीएसटी संकलनातून सीजीएसटी ला 43,552 कोटी रुपये आणि एसजीएसटी ला  37,257 कोटी रुपये अदा  केले आहेत.

एप्रिल 2023-जानेवारी 2024 या कालावधीत, एकत्रित सकल जीएसटी संकलनात (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 पर्यंत) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6% वाढ झाली आणि ते 16.69 लाख कोटींवर  पोहोचले.  मागील वर्षी याच कालावधीत 14.96 लाख कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला होता.

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. ही आकडेवारी आज संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंतची (म्हणजे 31.01.2024) आहे. महिन्याचे अंतिम संकलन याहून अधिक असेल.

Chart: Trends in GST Collection

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000981) Visitor Counter : 231