वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह सोहोळ्यात 40 युनिकॉर्न सोबतच्या गोलमेज परिषदेचे पीयूष गोयल यांनी भूषवले अध्यक्षपद


गुंतवणूक, नेटवर्किंग आणि मार्गदर्शनाला चालना देण्यासाठी डीपीआयआयटी ने स्टार्टअप्ससाठी सुरु केला ‘स्टार्टअपशाळा’ हा पथदर्शी प्रवेगक कार्यक्रम

स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहादरम्यान विद्यार्थी, इच्छुक उद्योजकांसाठी ‘हाऊ टू स्टार्ट अप’ वेबिनारचे आयोजन

Posted On: 30 JAN 2024 9:28AM by PIB Mumbai

स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहादरम्यान, देशातल्या युनिकॉर्न्सची प्रगती साजरी करण्यासाठी आणि अधिकाधिक युनिकॉर्न्सच्या विकासाला पाठबळ पुरवण्यासाठी  सहयोगी मार्ग तयार करण्यासाठी 40युनिकॉर्न्सच्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भूषवले. 

सहभागी 40 युनिकॉर्न्सनी  अनुभवातून शिकलेल्या बाबींविषयी माहिती दिली, त्यांच्या विकासाला साहाय्य्यकारी ठरलेल्या घटकांची माहिती दिली आणि  जागतिक स्टार्ट अप अग्रणी म्हणून भारत उदयाला येण्यासाठी भारतीय पररिसंस्थेच्या विकासाला चालना देतील अशा क्षेत्रांविषयी सांगितले. गोयल यांनी युनिकॉर्न्सना एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातल्या स्टार्ट अप्ससाठी भांडवल मिळवण्यासाठी उपाय शोधेल अशा युनिकॉर्न क्लब किंवा असोसिएशनची  स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.  स्टार्टअप्सच्या भरभराटीसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, 2/3 स्तरीय शहरांमध्ये पोहोच  वाढवणे आणि खाजगी क्षेत्रातील वित्तीय संस्थांनी स्थापित  केलेल्या सर्वोत्तम पद्धतींपासून शिकणे यावर चर्चा  केंद्रित होती.

डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने या वर्षी, 10 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत  देशातील प्रमुख स्टार्टअप्स, उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि  देशभरातील नवोन्मेष  आणि उद्योजकतेसंबधी इतर भागधारक यांच्यासोबत उत्सव साजरा केला.

प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स ना ज्ञान, नेटवर्क आणि निधीची उपलब्धता आणि कौशल्यवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उदघाटनपर कार्यक्रमात ‘स्टार्टअपशाळा’ या स्टार्टअप इंडियाच्या स्टार्टअप्स साठी सुरू करण्यात आलेल्या 3 महिन्यांच्या प्रवेगक कार्यक्रमाचा समावेश आहे. कार्यक्रमातील प्रत्येक गट एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल. पहिला क्लीनटेक अर्थात स्वच्छ तंत्रज्ञान विषयक असेल आणि प्रत्येक गटातील 20 स्टार्टअप्सची निवड खुल्या प्रवेशिकांद्वारे तज्ज्ञ करतील. 10 जानेवारी 2024 पासून https://www.startupindia.gov.in/content/sih/en/Startup_Shala.html. या स्टार्टअप इंडिया हबवर प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत:

‘नवोदित उद्योजकांसाठी मार्ग प्रशिक्षण मालिका’ या शीर्षकाअंतर्गत विद्यार्थी आणि इच्छुक उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी, ‘हाऊ टू स्टार्ट अप’ या विषयावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 5 समर्पित वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग धुरिणीं आणि मार्गदर्शकांनी स्टार्टअप सुरू करण्याच्या मूलभूत गोष्टींबद्दल दृष्टिकोन आणि महत्वाचे पाठ सामायिक केले. ही सर्व सत्रे युवा उद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया सोशल मीडिया हँडलवर तसेच मायभारत पोर्टलवर थेट आयोजित करण्यात आली होती.

स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहाच्या 75 हून अधिक प्रत्यक्ष कार्यक्रमांनी भारताच्या समृद्ध परिसंस्थेचे प्रदर्शन केले आणि असंख्य महत्त्वाकांक्षी संस्थापकांच्या स्वप्नांना जागृत करत उद्योजकतेसाठी उत्प्रेरक म्हणून काम केले. महिला उद्योजकांना सक्षम बनवणाऱ्या कार्यशाळेपासून ते इनक्यूबेटर चॅम्पियन्ससाठी प्रशिक्षण केंद्रांपर्यंत, या आठवड्यात मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थीनी विचारांचे आदानप्रदान केले आणि महत्त्वाकांक्षी संस्थापकांच्या मनात उद्योजकतेची जाणीवजागृती केली. भविष्यातील स्टार्टअप परिसंस्थेला आकार देणारी युती बनवून हितधारकांच्या चर्चेसह अनेक शहरांमध्ये अनेक विचारप्रवर्तक गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले.

कॉर्पोरेट्ससह स्टार्टअप्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देखील आठवड्याच्या प्रारंभी सुरू करण्यात आले. या मालिकेत आर्थिक कर्ज आणि पाठबळ, कार्यान्वयन, शाश्वत नवोन्मेष आणि भेदक तंत्रज्ञान या क्षेत्रातील कॉर्पोरेट्ससह निवडक स्टार्टअप्सना विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन समाविष्ट आहे. एचसीएल, एचएसबीसी इंडिया, क्वालकॉम इंडिया प्रा. लि. आणि टीसीएस फाउंडेशन हे कॉर्पोरेट भागीदारांचा यात सहभाग होता. 

नवोन्मेष आणि शाश्वतेबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्टार्टअप इंडियाच्या जागतिक भागीदारांसोबत दृक्श्राव्य माध्यमातून शिष्टमंडळस्तरीय चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत समावेशन, निधी पुरवठा आणि आर्थिक सहाय्य, सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल, बाजारपेठ उपलब्धता आणि सरकारी पायाभूत सुविधांसह नवोन्मेषच्या 5 प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. शासकीय ई-बाजारपेठ (GeM) वर स्टार्टअप्सना उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सजग करण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई येथे एक समर्पित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 9 जानेवारी 2024 रोजी तेलंगणातील हैदराबाद विद्यापीठात सार्वजनिक खरेदीवर एक यशस्वी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 70 हून अधिक उद्योजकांचा सहभाग होता.

***

Sonal T/Sonali K/Vasanti J/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000528) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu