उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती 28-29 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र आणि तामिळनाडूला भेट देणार


उपराष्ट्र्पती मुंबईत विधिमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84 व्या परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार

उपराष्ट्रपती पाँडिचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी “विकसित भारत @2047” या संकल्पनेबाबत साधणार संवाद

Posted On: 27 JAN 2024 2:04PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड  28-29 जानेवारी 2024 रोजी मुंबई (महाराष्ट्र), पुदुचेरी आणि कुड्डालोर (तामिळनाडू) च्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत.

पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती महाराष्ट्रात मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेत भारतातील विधिमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84 व्या परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत.

त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती पाँडिचेरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी विकसित भारत @2047” या संकल्पनेवर संवाद साधतील.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, उपराष्ट्रपती तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील श्री थिलाई नटराजर मंदिर, बाबाजी मंदिर आणि श्री इलाई अम्मन मंदिरात प्रार्थना करतील आणि दर्शन घेतील.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000020) Visitor Counter : 99