राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ केले मेजवानीचे आयोजन


भारत -फ्रान्स यांच्यातल्या मैत्रीतील सौहार्द आणि आपल्या भागीदारीचे सामर्थ्य आपला पुढचा मार्ग अधिकच प्रकाशमान करणारे ठरेल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 26 JAN 2024 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 जानेवारी 2024) राष्ट्रपती भवनात, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या सन्मानार्थ आज विशेष मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रपती भवनात इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे स्वागत करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, दोन्ही देशांच्या दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या राष्ट्रीय दिनाच्या पथसंचलनात, प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. आणि दोन्ही देशांमध्ये झालेले समारंभ ऐतिहासिक ठरले असून, आपल्यातील मैत्रीची सखोलता तसेच भागीदारीतील सामर्थ्य याचे, हे समारंभ प्रतीक ठरले आहे.

स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय ही सामायिक मूल्ये आपल्या दोन महान लोकशाही देशांना  जोडत असतानाच, आपल्या लोकांमधील बंध अधिक दृढ आहेत, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. दोन्ही देशातील लोकांनी, आपल्या विचारांनी आणि आदर्शांनी एकमेकांना प्रेरणा दिली आहे, तसेच,  आम्ही तत्वज्ञान, साहित्य, कला, धर्मग्रंथ, भाषा आणि इतर माध्यमांद्वारे एकमेकांना समृद्ध केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुद्दुचेरीच्या चैतन्यमय वारशात, फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव आणि फ्रान्समधील भारतीय नागरिकांशी तिथल्या लोकांचे असलेले सखोल संबंध याचा अनुभव आपण स्वतःही घेतला असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. पुद्दुचेरी हा खरोखरच फ्रान्स आणि भारत यांच्यातील चैतन्यमय पूल आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

भारताच्या अमृत काळासाठी, आपल्या भागीदारीच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाची रूपरेषा दोन्ही बाजूंनी आखली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. आपल्या या भारत या भेटीमुळे, हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प अधिकच दृढ झाला आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

भारत -फ्रान्स यांच्यातल्या मैत्रीतील सौहार्द आणि आपल्या भागीदारीचे सामर्थ्य,  आपला पुढचा मार्ग अधिकच प्रकाशमान करणारे ठरेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999962) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi