जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयाचा कार्यक्रम


केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ‘स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण’ च्या परिवर्तनकारी महिलांचा सन्मान

Posted On: 26 JAN 2024 10:39AM by PIB Mumbai

‘स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण’ च्या परिवर्तनकारी महिलांचा सन्मान करण्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत जलशक्ती मंत्रालयाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहकार्य वाढवून प्रगतीला चालना देणे हे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. या कार्यक्रमात देशभरातील 475 हून अधिक महिलांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी महत्वपूर्ण संवाद साधला.

‘स्वच्छ भारत अभियान-ग्रामीण’ चे सहसचिव आणि अभियान संचालक जितेंद्र श्रीवास्तव यांनी सहभागींचे स्वागत केले आणि या नारी शक्तीला 'जगात जो बदल अभिप्रेत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.' त्यांनी देशभरातील एसबीएम प्रगतीबद्दल अद्ययावत माहिती दिली ज्यात लवकरच अधिकाधिक गावे ‘ओडीएफ प्लस’ मॉडेल अर्थात हगणदारी  मुक्त आदर्श गाव श्रेणीत गणली जातील. स्वच्छतेचा प्रवास अधोरेखित करताना, आपण ‘आपली कचरा व्यवस्थापन प्रणाली सुधारली पाहिजे, विविध राज्यांकडून शिकले पाहिजे आणि ‘संपूर्ण स्वच्छतेसाठी जन भागिदारी’ वर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 

या समर्पित महिलांच्या अनुकरणीय कार्याचा गौरव म्हणून या कार्यक्रमाने "स्वच्छता शक्ती: तळागाळात भारताच्या स्वच्छतेत परिवर्तन करणाऱ्या महिलांच्या कथा" या विषयावर उद्बोधन केले. 

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अग्रणी महिलांचे कौतुक करताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, तुम्ही सर्वजण मिळून 'विशिष्ट भौगोलिक रचना आणि भूप्रदेश असणाऱ्या विविध राज्यांतील महिलांच्या वैविध्यपूर्ण सामर्थ्याला प्रेरणा देत आहात, या कार्यक्रमाप्रती आणि स्वच्छता अभियानाप्रती असलेली तुमची बांधिलकी हा तुम्हा सर्वांना बांधणारा अतूट समान धागा आहे. आपण तंत्रज्ञानविषयक उपायांचा धांडोळा घेऊन परस्परांकडून शिकले पाहिजे.

आपल्या समारोपाच्या भाषणात, केंद्रीय जलशक्ती मंत्री म्हणाले, आपला हा स्वच्छतेचा प्रवास आमच्यासोबत सामायिक केलेल्या सर्व परिवर्तनकारी महिलांनी आपल्या गावी परत गेल्यावर देशभरात स्वच्छता आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात होत असलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल लोकांना परिचित करावे. ते म्हणाले, “मला खात्री आहे की हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे आणि यातून तुम्हाला अधिक समर्पणाने काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही घालून दिलेल्या उदाहरणातून मांडलेले उदाहरण पाहून इतरांचेही प्रबोधन होईल आणि 'संपूर्ण स्वच्छ भारत' बनवण्यात ते योगदान देतील." 

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - sbm.gov.in

***

Suvarna B/ Vasanti J/CYadav 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999833) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil