संरक्षण मंत्रालय
75 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपतींनी भारतीय तटरक्षक दलाच्या सहा जवानांना राष्ट्रपती तटरक्षक पदक आणि तटरक्षक पदक प्रदान करण्यास दिली मंजुरी
Posted On:
25 JAN 2024 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय तटरक्षक दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खालील जवानांना त्यांच्या अभूतपूर्व शौर्य, कर्तव्याप्रती अपवादात्मक निष्ठा, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती तटरक्षक पदक आणि तटरक्षक पदकांना मंजुरी दिली आहे.
राष्ट्रपती तटरक्षक पदक (विशिष्ट सेवा)
- आयजी भीष्म शर्मा, टीएम (0247-L)
तटरक्षक पदक (शौर्य)
- कमांडंट सुनील दत्त (0662-D)
- कमांडंट (JG) सौरभ (0735-S)
तटरक्षक पदक (गुणवत्तापूर्ण सेवा)
- डीआयजी अनिल कुमार परायल (0265-C)
- डीआयजी जमाल ताहा (4085-J)
- दिपक रॉय, P/Adh (AR), 01111-Z
या विशिष्ट व्यक्तींनी सागरी सीमांचे रक्षण, समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद आणि देशाच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची कर्तव्याप्रती निष्ठा उच्च दर्जाची सेवा प्रतिबिंबित करते आणि भारतीय तटरक्षक दलाच्या भावनेला मूर्त रूप देते. हे पुरस्कार नाविकांना सुरक्षित समुद्र प्रदान करण्यासाठी आणि राष्ट्राची मूल्ये जपण्यासाठी अथक परिश्रम करणार्या भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांच्या शौर्य आणि वचनबद्धतेला मानवंदना आहे.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999711)