पंचायती राज मंत्रालय
भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पंचायती राज मंत्रालयाकडून पंचायती राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी आमंत्रित
प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी उपस्थित विशेष पाहुण्यांना केंद्रीय पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह आणि केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटील सन्मानित करणार
Posted On:
25 JAN 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी, पंचायती राज मंत्रालयाने उत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना नवी दिल्लीतली कर्तव्य पथ येथे भव्य आणि प्रतिष्ठित प्रजासत्ताक दिन संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.लोक सहभाग या सरकारच्या संकल्पनेनुसार पंचायत प्रतिनिधींना राष्ट्रीय उत्सवात भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.

संचलनानंतर, केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह, ग्रामविकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते आणि पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमासाठी पंचायतींचे प्रतिनिधी 27, लोधी इस्टेट, नवी दिल्ली येथील केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी एकत्र येतील, या कार्यक्रमात पंचायती राज संस्थांच्या निमंत्रित प्रतिनिधींचा तळागाळातील प्रशासनात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंचायती राज मंत्रालयाने देशभरातून सुमारे 500 सन्माननीय पाहुण्यांना आमंत्रित केले आहे, ज्यात पंचायती राज संस्थांचे प्रतिनिधी आणि त्यांच्या जोडीदाराचा समावेश आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999601)