अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तयारीच्या अंतिम टप्प्याला हलवा समारंभाने प्रारंभ

Posted On: 24 JAN 2024 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2024 

 

हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024  तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखला जाणारा हलवा समारंभ आज केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे  पार पडला.

दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्याची "लॉक-इन" प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पारंपरिक हलवा समारंभ आयोजित केला जातो.

  

मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, यंदाचा हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 देखील कागदरहित असणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024  सादर केला जाणार आहे.

राज्य घटनेत विहित केल्याप्रमाणे, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे  अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाच्या मागण्या, वित्त विधेयक यांसह  सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज "केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप" वर उपलब्ध असेल. डिजिटल सुविधेचा सर्वात सोपा प्रकार वापरून संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य लोकांना हे अर्थसंकल्प दस्तावेज सहज पाहता येतील. हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.  केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील हे अॅप डाउनलोड करता येईल.

  

  

1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अॅपवर उपलब्ध होतील.

हलवा समारंभाला केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत वित्त आणि व्यय सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार सचिव  अजय सेठ, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे, महसूल सचिव  संजय मल्होत्रा, सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ चे अध्यक्ष  नितीन गुप्ता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ चे अध्यक्ष  संजय कुमार अग्रवाल, आणि अतिरिक्त सचिव (अर्थसंकल्प) आशिष वाछानी,  तसेच अर्थसंकल्पाची तयारी  आणि संकलन प्रक्रियेत सहभागी अर्थ मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी  देखील यावेळी उपस्थित होते.

  

समारंभाचा एक भाग म्हणून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसची देखील पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच तयारीचा आढावा घेतला.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999379) Visitor Counter : 244


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia