मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री परुषोत्तम रुपाला येत्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट इथे 250 विशेष अतिथी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद
Posted On:
24 JAN 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने येत्या प्रजासत्ताक दिनी, नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या 250 लाभार्थ्यांना त्यांच्या जोडीदारासह आमंत्रित केले आहे. हे विशेष पाहुणे 26 जानेवारी, 2024 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर विशेष आसन व्यवस्था केलेल्या " कक्ष क्रमांक 20" मधून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होतील. तर 25 जानेवारी रोजी ते नवी दिल्लीतील विविध प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट देतील.
केंद्रीय मंत्री परुषोत्तम रुपाला 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट इथे आयोजित कार्यक्रमात या विशेष पाहुण्यांशी संवाद साधणार आहेत. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान आणि डॉ. एल. मुरुगनही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर या विशेष पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात आले, त्यांच्याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातील विविध राज्यांमधील लाभार्थी आज नवी दिल्लीत येत आहेत. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने केंद्र सरकारच्या विविध योजना, उपक्रम, स्पर्धा आणि कार्यक्रमांमधील प्रतिष्ठित लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनी त्यांच्या जोडीदारासह येण्याचे आमंत्रण दिले आहे. या निमंत्रितांना प्रजासत्ताक दिन संचलनात सरकारचे विशेष पाहुणे म्हणून सन्मान देण्यात आला आहे.
* * *
R.Aghor/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999149)
Visitor Counter : 83