पंतप्रधान कार्यालय
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना मिळणार छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2024 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2024
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणा मिळणार आहे.
पंतप्रधान म्हणाले, "आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, देशातील जनतेच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.
यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.
एक्स पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:
“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या दर्शनातून नेहमीच ऊर्जा मिळते.
आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सौर ऊर्जा यंत्रणा असावी, हा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
अयोध्येहून परतल्यानंतर मी घेतलेला पहिला निर्णय हा आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.
यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरही होईल.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998659)
आगंतुक पटल : 455
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam