युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्राचा जिम्नॅस्टिक्सपटू आर्यन दवांडेने मुलांच्या आर्टिस्टिक ऑल -राऊंड प्रकारात पटकावले सुवर्णपदक

Posted On: 22 JAN 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2024

 

गतविजेत्या महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सोमवारी आपले सुवर्णपदकाचे खाते उघडले. एसडीएटी एक्वाटिक्स संकुलात महाराष्ट्राचा जिम्नॅस्टिक्सपटू आर्यन दवांडे याने आर्टिस्टिक ऑल -राऊंडचे विजेतेपद पटकावले. 

दवांडेने एकूण 73.200 गुण मिळवत  उत्तर प्रदेशच्या प्रणव मिश्राला (72.470 गुण) मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या हर्षितने 71.700 गुणांसह कांस्यपदक जिंकले, या प्रकारात विजेते ठरण्यासाठी मुलांना सहा वेगवेगळ्या साधनांवर कामगिरी करून दाखवावी  लागते.

सुवर्णपदकामुळे  महाराष्ट्राने  4 रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण 10 पदके जिंकत   तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

यजमान तामिळनाडूने पाच सुवर्णपदकांसह पदक तालिकेत  अव्वल स्थान कायम राखले आहे .

बॉईज टाईम ट्रायलमध्ये, तेलंगणाच्या आशीर्वाद सक्सेनाने 1:12.652 सेकंदांची कामगिरी नोंदवत  सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या वेदांत जाधव (1:13.362 सेकंद) आणि हरियाणाच्या गुरमूर पुनियाला  (1:14.192 सेकंद) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

फोटो कॅप्शन: महाराष्ट्राचा जिम्नॅस्टिक्सपटू  आर्यन दवांडे सोमवारी चेन्नई येथील एसडीएटी  एक्वाटिक्स संकुलात आर्टिस्टिक ऑल राऊंड स्पर्धेदरम्यान हॉरीझॉन्टल बारवर आपले कौशल्य दाखवताना.  दवांडेने 73.200 गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

पदकतालिका : https://youth.kheloindia.gov.in/medal-tally

निकाल-संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

सायकलिंग मध्ये मुलींच्या गटात टीम स्प्रिंट मध्ये महाराष्ट्राला (1:20.814) कांस्यपदक

सायकलिंग मध्ये मुलांच्या गटात टीम स्प्रिंट मध्ये महाराष्ट्राला (1:10.434) रौप्यपदक

जिम्नॅस्टिक्समध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्यन दवांडेला (73.200) सुवर्णपदक

स्क्वॅश मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकचा 3-0 असा पराभव केला.

स्क्वॅश मध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत राजस्थानकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1998654) Visitor Counter : 118