उपराष्ट्रपती कार्यालय
प्राणप्रतिष्ठे निमित्ताने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला संदेश
Posted On:
22 JAN 2024 9:05AM by PIB Mumbai
रामजन्मभूमी असलेल्या या ऐतिहासिक नगरी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या युगप्रवर्तक दिनी आपल्या सर्वांचे अभिनंदन.
सर्वत्र राष्ट्रीय अभिमान जागृत करणाऱ्या या उत्सवाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
आपल्या 11 दिवसांच्या कठोर ‘अनुष्ठान’नंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला मार्गदर्शन करणार्या इतर यजमान, संत आणि संतांच्या उपस्थित होणाऱ्या या सोहळ्याचे नेतृत्व करत आहेत त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या सभ्यतेच्या प्रवासाच्या इतिहासात 22 जानेवारी हा दिवस 'देवत्वाचा प्रयत्न' या अर्थाने परिभाषित क्षण म्हणून कोरला जाईल.
आजच्या दिवशी आपण प्रभू श्री राम यांची सचोटी, क्षमा, शौर्य, प्रामाणिकपणा, विनम्रता, काळजी आणि करुणा ही जीवनपद्धती आत्मसात करून सर्वत्र आत्मज्ञान, शांती, सौहार्द आणि धार्मिकता आणण्याचा संकल्प करूया.
अयोध्या या ऐतिहासिक नगरी, #रामजन्मभूमी येथील #राममंदिरप्राणप्रतिष्ठेच्या या युगप्रवर्तक दिनानिमित्त अभिनंदन.
सर्वत्र राष्ट्रीय अभिमान जागृत करणाऱ्या उत्सवाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांना या सोहळ्याचे नेतृत्व केल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा,…
— उपराष्ट्रपती (@VPIndia) 22 जानेवारी 2024
***
JPS/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1998498)
Visitor Counter : 118