महिला आणि बालविकास मंत्रालय

यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांची घोषणा

Posted On: 19 JAN 2024 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) - असामान्य क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार दिले जातात.  प्रत्येक पुरस्कारार्थीला  पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

राष्ट्रपतींच्या हस्ते 22 जानेवारी, 2024 रोजी विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील. यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील सर्व विभागांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या 19 मुलांची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.

निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश आहे. या यादीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. यादी खालीलप्रमाणे आहे.

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2024

Sr. No.

Name

 

State

Category

  1.  

Aaditya Vijay Bramhane (posthumous)

Maharashtra

Bravery

  1.  

Anushka Pathak

Uttar Pradesh

Art & Culture

  1.  

 

Arijeet Banerjee

West Bengal

Art & Culture

  1.  

Armaan Ubhrani

Chattisgarh

Art & Culture

  1.  

Hetvi Kantibhai Khimsuriya

Gujarat

Art & Culture

  1.  

Ishfaq Hamid

Jammu & Kashmir

Art & Culture

  1.  

Md Hussain

Bihar

Art & Culture

  1.  

Pendyala Laxmi Priya

Telangana

Art & Culture

  1.  

Suhani Chauhan

Delhi

Innovation

  1.  

Aryan Singh

Rajasthan

Science & Technology

  1.  

Avnish Tiwari

Madhya Pradesh

Social Service

  1.  

Garima

Haryana

Social Service

  1.  

Jyotsna Aktar

Tripura

Social Service

  1.  

Saiyam Mazumder

Assam

Social Service

  1.  

Aaditya Yadav

Uttar Pradesh

Sports

  1.  

Charvi A

Karnataka

Sports

  1.  

Jesicca Neyi Saring

Arunachal Pradesh

Sports

  1.  

Linthoi Chanambam

Manipur

Sports

  1.  

R Surya Prasad

Andhra Pradesh

Sports

 

 S.Kakade/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1997916) Visitor Counter : 195