कोळसा मंत्रालय
एसईसीएल आणि एम. पी. पी. जी. सी. एल. च्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड आणि एम. बी. पी. एल. च्या माध्यमातून 800 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महानदी कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या समभाग गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
18 JAN 2024 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत, (1) दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड (एसईसीएल) द्वारे एसईसीएल आणि एम. पी. पी. जी. सी. एल. च्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी; आणि (2) महानदी बेसिन पोवे लिमिटेडच्या माध्यमातून 800 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (एम. सी. एल.) च्या समभाग गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सीसीईएने एसईसीएल, एमसीएल आणि सीआयएलच्या समभाग गुंतवणुकीच्या प्रस्तावाला खालीलप्रमाणे मंजुरी दिली आहेः
- एसईसीएलचे ₹.823 कोटी (± 20%) समभाग भांडवल कर्ज-समभाग गुणोत्तर 70:30 आणि 49% समभाग गुंतवणूक विचारात घेऊन एसईसीएलने मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यातील चाचाई गावातल्या अमरकंटक औष्णिक ऊर्जा केंद्रातील एसईसीएल आणि एमपीपीजीसीएलच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून प्रस्तावित 1×660 मेगावॅट अतिमहत्वाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 5,600 कोटी रुपयांच्या (± 20%) गुंतवणुकीला मान्यता.
- एमसीएल चे 4,784 कोटी रुपयांचे समभाग (± 20%) एमबीपीएलद्वारे ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात प्रस्तावित 2×800 मेगावॅट सुपर-क्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प, ज्याचे अंदाजे भांडवल,15,947 कोटी रुपये (± 20%), आहे, त्यात गुंतवणूक.
- एम. बी. पी. एल. या एमसीएल च्या स्पेशल पर्पस व्हेइकल ला 2×800 मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता.
- सीआयएलद्वारे समभाग गुंतवणूक एसईसीएल-एमपीपीजीसीएलच्या संयुक्त उपक्रमातील निव्वळ मूल्याच्या 30% पेक्षा जास्त (Rs.823 कोटी ± 20%) आणि एमबीपीएलमध्ये, एमसीएलची 100% पूर्ण मालकीची उपकंपनी (Rs.4,784 कोटी ± 20%) वर (b) मुद्यात नमूद केल्याप्रमाणे.
जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी कोल इंडिया लिमिटेड (सी. आय. एल.) देशाला स्वस्त वीज पुरवण्याच्या उद्देशाने आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून पुढील दोन पिट-हेड औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे, ते पुढीलप्रमाणे -
- मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील चाचाई गावातील अमरकंटक औष्णिक विद्युत केंद्रावरील 660 मेगावॅट क्षमतेचा अतिमहत्वाचा कोळसा-आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प (टी. पी. पी.),
- ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील एस. ई. सी. एल. आणि मध्य प्रदेश पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेड (एम. पी. पी. जी. सी. एल.) 2×800 मेगावॅट क्षमतेचा अतिमहत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून एम. सी. एल. ची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी 'महानदी बेसिन पॉवर लिमिटेड' (एम. बी. पी. एल.) च्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आला आहे.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997294)
Visitor Counter : 97