उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भगवान गौतम बुद्धांची शिकवण आपल्या भविष्यासाठी दिशादर्शक : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन


भगवान बुद्धांची तत्त्वे आशेचा किरण आहेत: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी आशियाई बौद्ध शांतता परिषदेच्या 12 व्या महासभेचे केले उद्घाटन

Posted On: 17 JAN 2024 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024

भगवान गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे भूतकाळातील स्मृती नसून, ती उद्याच्या भविष्यासाठी दिशादर्शक असल्याचे  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस (ABCP), अर्थात आशियाई बौद्ध  शांतता परिषदेच्या 12 व्या महा सभेला संबोधित करत होते. जगाला धोका निर्माण करणाऱ्या द्वेष आणि दहशतीच्या शक्तीं विरोधात भगवान गौतम बुद्धांचा शांतता, सौहार्द आणि सह-अस्तित्वाचा संदेश  ठामपणे उभा आहे, असे ते यावेळी म्हणाले.

नैतिक अनिश्चिततेच्या युगात, बुद्धांची शिकवण शाश्वतता, साधेपणा, संयम आणि सर्वांप्रती आदर याचा मार्ग दाखवते, असे ते म्हणाले. त्यांची चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग आपल्याला मनःशांती,  करुणा आणि अहिंसेचा मार्ग दाखवतो, जो आजच्या संघर्षांचा सामना करणाऱ्या व्यक्ती आणि देशांसाठी पथदर्शक आहे, ते म्हणाले.

धनखड यांनी बुद्धांच्या शिकवणीचा भारताच्या सेवा आधारित प्रशासनाच्या दृष्टिकोनावर असलेला प्रभाव नमूद केला. नागरिकांचे कल्याण, सर्वसमावेशकता आणि पर्यावरणीय शाश्वतता याला प्राधान्य देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेमध्ये ही तत्त्वे मार्गदर्शक शक्ती म्हणून कसे काम करतात, हे त्यांनी अधोरेखित केले.

हवामान बदल, संघर्ष, दहशतवाद आणि गरिबी यासारखी सध्याची जागतिक आव्हाने हाताळण्यासाठी भगवान बुद्धांची तत्त्वे कालसुसंगत असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. भगवान बुद्धांची शिकवण आशेचा किरण आहेत. अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी सहयोगी, आणि सामुहिक दृष्टीकोन गरजेचा असल्याचे ते म्हणाले.  

भारत हा भगवान बुद्धांच्या तत्त्वांचे मार्गदर्शन लाभलेला देश असल्याचे सांगून   "आम्हाला अशा देशाचे नागरिक असल्याचा अभिमान आहे, ज्याने जगाला 'युद्ध' नाही तर 'बुद्ध' दिला आहे, "या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार धनखड यांनी केला.

जगभरातील युवा पिढीपर्यंत भगवान बुद्धांबद्दल अधिकाधिक माहिती पोहोचवण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करत, उपराष्ट्रपती धनखड यांनी बुद्धिस्ट सर्किट आणि इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धीस्ट कल्चरच्या विकासामधील भारताच्या सक्रिय भूमिकेचा उल्लेख केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना बौद्ध वारसा स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळण सुविधा वाढवली आहे.

उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण -   Text of the Vice-President’s speech - 12th General Assembly of the Asian Buddhist Conference for Peace

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1997045) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil