सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समावेशकतेला बळकटी : दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगाराला चालना देण्यासाठी डीईपीडब्ल्यूडी आणि एनएचआरडीएन यांच्यात समन्वय

Posted On: 16 JAN 2024 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (डीईपीडब्ल्यूडी) आणि राष्ट्रीय मनुष्यबळ विकास नेटवर्क(एनएचआरडीएन)  यांनी गोव्यात 'पर्पल फेस्ट' या महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी  सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. नवोन्मेषी पीएम- दक्ष-  डीईपीडब्ल्यूडी( PM-DAKSH-DEPWD) पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या रोजगार संधींचे समुच्चीकरण, हा या समन्वयामागचा उद्देश आहे.

हा सामंजस्य करार विभागाचा संपर्क वाढवण्यासाठी, मनुष्यबळ  व्यावसायिकांशी देशव्यापी संबंध वाढवण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी  अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यशक्तीला चालना देण्यासाठी प्रयत्न वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

 

Jaydevi PS/S.Kakade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1996590) Visitor Counter : 121
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu