वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचच्या (TPF) 14 व्या मंत्रीस्तरीय बैठकीचे नवी दिल्ली येथे आयोजन

Posted On: 13 JAN 2024 9:21AM by PIB Mumbai

भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचची (TPF) 14 वी मंत्रीस्तरीय बैठक 12 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली, भारत येथे आयोजित करण्यात आली होती. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी, राजदूत कॅथरीन ताय यांनी या उद्योग धोरण परिषदेचे (TPF) सह-अध्यक्षस्थान भूषविले. 


यावेळीआर्थिकदृष्ट्या अर्थपूर्ण परिणाम साध्य करण्यासाठी सहकार्य वाढविण्यासाठी, महत्‍वपूर्ण खनिजे, सीमाशुल्क आणि व्‍यापार सुविधा, पुरवठा साखळी आणि उच्च तंत्रज्ञान उत्‍पादनांमध्‍ये व्‍यापार यासह काही क्षेत्रांमध्‍ये भावी संयुक्‍त उपक्रम सुरू करण्‍यासाठी फाऊंडेशनचा पाठपुरावा करण्‍यासाठी आम्ही वचनबद्ध आहेत, ज्यायोगे अमेरिका आणि भारत आपला महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी विकास साध्य करु शकतील, असे उभय देशांतील मंत्रीमहोदयांनी जाहीर केले. 

यूएस जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस प्रोग्राम अंतर्गत लाभार्थी दर्जा पुनर्संचयित करण्यात भारताला रस असल्याचा गोयल यांनी पुनरुच्चार केला.यू.एस. काँग्रेसने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांच्या संदर्भात हे अधिकृत म्हणून मानले जाऊ शकते, राजदूत ताय यांनी यावेळी नमूद केले.

वस्तू आणि सेवांमधील भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारातील सतत वाढत असणाऱ्या गतीशीलतेची प्रशंसा करत जागतिक व्यापारी वातावरण आव्हानात्मक असूनही  वर्ष 2023 मध्ये 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मर्यादा ओलांडली आहे, याबद्दल मंत्रीद्वयांनी संतोष व्यक्त केला.

****

Sonal T/Sampada P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995822) Visitor Counter : 89