अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 10.01.2024 पर्यंत बजेट अंदाजाच्या 80.61% प्रत्यक्ष कर संकलन
Posted On:
11 JAN 2024 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024
चालू आर्थिक वर्षात 10 जानेवारी 2024 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे वाढ दर्शवत आहेत. चालू आर्थिक वर्षात 10 जानेवारी 2024 पर्यंतचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन रु. 17.18 लाख कोटी इतके असून, ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील एकूण संकलनापेक्षा 16.77% जास्त आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 80.61% संकलन आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने, कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी ) संकलानामधील वाढीचा दर लक्षात घेता,
सीआयटी साठी वाढीचा दर 8.32% आहे तर केवळ पीआयटी साठी 26.11%, आणि (एसटीटी सह पीआयटी) 26.11% इतका आहे.
परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी संकलनात एकूण वाढ 12.37% आहे आणि पीआयटी (केवळ पीआयटी )संकलनात 27.26% आहे, आणि (एसटीटी सह पीआयटी) 27.22% इतकी आहे.
परताव्यापोटी 1 एप्रिल 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत 2.48 लाख कोटी रु.जारी करण्यात आले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995358)
Visitor Counter : 161