कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 साठी योजना आणि वेब पोर्टल चे उद्घाटन
पंतप्रधान पुरस्कार 2023 च्या पारितोषिकाची रक्कम 20 लाख रुपये असेल
Posted On:
08 JAN 2024 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 8 जानेवारी 2024
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागातर्फे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 साठी 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता योजना आणि वेब पोर्टल (http://www.pmawards.gov.in) चे उदघाटन करण्यात आले. सर्व प्रधान सचिव (एआर)/(आयटी), आणि सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हाधिकारी/ जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 8 जानेवारी 2024 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन समारंभात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
2. वैध नोंदणी आणि अर्ज दाखल करण्याकरिता पंतप्रधान पुरस्कार वेब पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे आणि ती 8 जानेवारी 2024 पासून 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येईल.
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 2014 पासून पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांच्या एकंदर संकल्पना आणि स्वरूपामध्ये क्रांतिकारी बदल झाला आहे. या योजनेचा उद्देश रचनात्मक स्पर्धा, नवोन्मेष, प्रतिकृती आणि सर्वोत्तम पद्धतींच्या संस्थापनाला प्रोत्साहन देणे हा आहे. या दृष्टिकोनांतर्गत, केवळ परिमाणवाचक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर न देता सुशासन, गुणात्मक कामगिरी आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपर्क सुविधेवर भर दिला जाईल. पुरस्कार योजनेची आता, यावर्षी, लक्ष्यित वैयक्तिक लाभार्थींद्वारे जिल्हाधिकार्यांची कामगिरी जोखण्यासाठी आणि सारासार दृष्टिकोनातून अंमलबजावणीसाठी पुनर्रचना करण्यात आली आहे. या उद्दिष्टासह, पुरस्कारांसाठीच्या अर्जांचे मूल्यमापन सुशासनात्मक, गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा तीन घटकांवर केले जाईल.
4. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 या योजनेत सर्व जिल्ह्यांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे.
5. नागरी सेवकांचे योगदान दोन श्रेणींमध्ये जाणून घेणे हे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कार 2023 च्या योजनेचे उद्दिष्ट आहे:
श्रेणी -1- 12 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणी अंतर्गत 10 पुरस्कार प्रदान केले जातील.
श्रेणी 2: केंद्रीय मंत्रालये/विभाग राज्ये, जिल्ह्यांसाठी नवोन्मेष. या श्रेणी अंतर्गत 6 पुरस्कार प्रदान केले जातील.
6. विचाराधीन कालावधी 1 एप्रिल 2021 ते 31 जानेवारी 2024 आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 अंतर्गत एकूण पुरस्कारांची संख्या 16 असेल.
7. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये (i) स्क्रीनिंग समिती (पहिला आणि दुसरा टप्पा), (ii) तज्ञ समितीद्वारे मूल्यांकन आणि (iii) अधिकारप्राप्त समितीद्वारे जिल्हा/ संस्थांची निवडक यादी करण्यात येईल. पुरस्कारांसाठी अधिकारप्राप्त समितीच्या शिफारशींवर पंतप्रधानांची मंजुरी घेतली जाईल.
8. पंतप्रधान पुरस्कार 2023 मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल: (i) चषक (ii) सन्मानपत्र आणि (iii) 20 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम. पुरस्कारप्राप्त जिल्हा/संस्थेला प्रकल्प/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी किंवा सार्वजनिक कल्याण क्षेत्रातील कोणत्याही विभागातील संसाधनातील तफावत भरून काढण्यासाठी ती रक्कम वापरण्यात येणार आहे.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994170)
Visitor Counter : 155