अल्पसंख्यांक मंत्रालय
भारताने सौदी अरेबिया सोबत केली द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी
Posted On:
07 JAN 2024 8:23PM by PIB Mumbai
केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्या सह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024 वर स्वाक्षरी केली.
हज 2024 साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल, तर 35,005 यात्रेकरूंना हज समुहाच्या परिचालकांद्वारे हजयात्रा करण्याची परवानगी दिली जाईल.
लेडीज विदाऊट मेहरम (LWM) श्रेणी अंतर्गत सहभागास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राबवलेल्या उपक्रमाची यावेळी चर्चा झाली, तसेच या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत वाहवा केली गेली.
द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आणि सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर,स्मृती झुबिन इराणी यांच्यासोबत मुरलीधरन यांनी, जेद्दाहच्या किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हज टर्मिनलला भेट दिली. हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि भारतीय हज यात्रेकरुंच्या सोयीसाठी उत्तम मालवाहतूक तसेच देखरेख यंत्रणा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही भेट होती.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994034)
Visitor Counter : 146