अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात, अस्तित्त्वात नसलेल्या करदात्यांच्या विरोधात मे 2023 पासून सातत्याने राबवलेल्या मोहिमेत, 44,015 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट चुकवल्याचा संशय असलेल्या 29,273 बोगस कंपन्या उघड, 121 जणांना अटक

Posted On: 07 JAN 2024 6:01PM by PIB Mumbai

 

वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) घोटाळे रोखण्यासाठी आणि अनुपालन वाढविण्यासाठी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या अंतर्गत देशभरात, जीएसटी संबंधितांकडून मोहीम राबवली जात आहे.अस्तित्त्वात नसलेल्या/बोगस नोंदी आणि वस्तू- सेवांचा कोणताही मूलभूत पुरवठा न करता बनावट पावत्या जारी करणाऱ्यांवर, ही मोहीम लक्ष केंद्रित करत आहे.

मे 2023 च्या मध्यात बनावट नोंदणी विरोधात विशेष मोहीम सुरू झाल्यापासून, 44, 015 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चुकवल्याचा संशय असलेल्या  एकूण 29,273 बोगस कंपन्या सापडल्या आहेत. यामुळे 4,646 कोटी  रुपयांची बचत झाली आहे. त्यापैकी 3,802 कोटी  रुपयांची बचतआयटीसी रोखून धरत आणि 844 कोटी रुपयांची बचत, वसुलीच्या माध्यमातून झाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 121 जणांना अटक करण्यात आली आहे.

डिसेंबर 2023 च्या अखेरच्या तिमाहीत,  12, 036 कोटी रुपयांचे आयटीसी चुकवल्याचा संशय असलेल्या 4,153 बोगस कंपन्या सापडल्या आहेत. यापैकी 2,358 बोगस कंपन्या केंद्रीय जीएसटी प्राधिकरणाने शोधून काढल्या आहेत. यामुळे 1,317 कोटी रुपयांचा महसूल वाचला आहे. त्यापैकी, वसुलीतून मिळालेली रक्कम 319 कोटी रुपये एवढी, तर आयटीसी रोखून वाचलेली रक्कम 997 कोटी रुपये एवढी आहे.  याप्रकरणी 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 31 जणांना केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. राज्यनिहाय तपशील उपलब्ध  आहेत.

जीएसटी नोंदणी प्रक्रिया मजबूत करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत.  नोंदणीच्या वेळी बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरणाचे प्रायोगिक प्रकल्प, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात  सुरू करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, जीएसटी विवरणपत्रे अनुक्रमे दाखल करणे, जीएसटीआर-1 आणि जीएसटीआर-3 बी मधील कर दायित्वातील तफावत दूर करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणेजीएसटीआर-2B आणि जीएसटीआर-3B नुसार उपलब्ध असलेल्या आयटीसीमधील तफावत कमी करणे, विदा विश्लेषणाचा वापर आणि बनावट आयटीसी शोधण्यासाठी जोखीम मापदंड यासारख्या उपाययोजनांद्वारे, सरकारने  कर चुकवेगिरीला आळा घालण्याचा  प्रयत्न केला आहे.

Action against bogus firms during Quarter ending in December 2023

Name of the State/UT

Number of bogus firms detected 

Tax Evasion suspected (Rs Cr.)

ITC amount blocked / recovered ( Rs Cr.)

Arrests Made 

Fake firms per lakh registered firms 

Andhra Pradesh

19

765

11

0

5

Arunachal Pradesh

0

13

14

0

0

Assam

19

116

67

0

8

Bihar

30

148

88

0

5

Chandigarh

2

5

1

0

6

Chhattisgarh

26

83

34

1

15

Dad. & Ngr Haveli

0

0

0

0

0

Delhi

483

3028

90

11

61

Goa

4

29

0

0

9

Gujarat 

178

445

25

3

15

Haryana

424

624

76

3

81

Himachal Pradesh

4

14

4

0

3

J&K

3

1

0

0

2

Jharkhand

23

110

2

0

11

Karnataka

223

397

59

2

22

Kerala

42

152

4

0

10

Ladakh

0

0

0

0

0

Madhya Pradesh

70

158

22

1

13

Maharashtra

926

2201

102

11

54

Manipur

0

0

0

0

0

Meghalaya

0

5

0

0

0

Mizoram

0

0

0

0

0

Nagaland

0

0

0

0

0

Odisha

138

337

7

0

42

Puducherry

2

2

0

0

8

Punjab

82

75

4

1

21

Rajasthan

507

197

31

1

59

Sikkim

2

2

2

0

18

Tamil Nadu

185

494

374

1

16

Telangana

117

536

235

1

23

Tripura

9

20

0

0

29

Uttar Pradesh

443

1645

44

5

24

Uttarakhand

66

88

0

0

33

West Bengal

126

343

18

0

17

And. & Nicobar Is

0

0

0

0

0

Lakshadweep

0

0

0

0

0

Total

4153

12036

1317

41

29

***

N.Chitale/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994023) Visitor Counter : 154


Read this release in: English , Hindi , Urdu , Telugu