दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार विभागाने सर्व संस्थांसाठी M2M आणि WPAN/WLAN नोंदणी केली विस्तारित


31 मार्च 2024 पर्यंत सरलसंचार पोर्टलद्वारे नोंदणी करण्याचा दिला सल्ला

नोंदणी न केल्यास अधिकृत दूरसंचार परवानाधारकांकडून दूरसंचार संसाधने काढून घेणार किंवा सेवा खंडित केली जाणार


संस्थांमध्ये व्यवसाय, सरकारी विभाग आणि भागीदारी समाविष्ट आहेत

दूरसंचार विभाग एक सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण M2M/IOT परिवेश निर्मिती सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध

Posted On: 07 JAN 2024 11:21AM by PIB Mumbai

दूरसंचार विभाग (DoT), दळणवळण मंत्रालयाने (MoC), मशीन-टू-मशीन (M2M) आणि वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क तसेच वायरलेस लोकल एरिया नेटवर्क (WPAN/WLAN) नोंदणी या व्यवसायात गुंतलेल्या सर्व घटकांसाठी विस्तारित केली आहे.

M2M सेवा तरतूदी आणि WPAN/WLAN कनेक्टिव्हिटी प्रोव्हिजनिंगमध्ये गुंतलेल्या सर्व व्यावसायिक घटकांना (कंपन्या, सरकारी विभाग/संस्था, भागीदारी फर्म, LLPs, संस्था, उपक्रम, मालकी संस्था, संस्था आणि ट्रस्ट) यांना दूरसंचार विभागात सरलसंचार पोर्टलच्या माध्यमातून (https://saralsanchar.gov.in) सोप्या आणि पारदर्शक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

या सूचनेचे पालन न केल्यास अधिकृत दूरसंचार परवानाधारकांकडून मिळालेल्या दूरसंचार संसाधन सेवा काढून घेतली जाऊ शकते किंवा खंडित केली जाऊ शकते.

मानक-आधारित आणि सुरक्षित M2M/IoT परिसंस्थेचा प्रसार करण्यासाठी नोंदणीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नोंदणीमुळे M2M सेवा प्रदाते आणि M2M सेवांसाठी WPAN/WLAN कनेक्टिव्हिटी प्रदात्यांच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (टीएसपी), केवायसी, सुरक्षा, एन्क्रिप्शन इत्यादीसह इंटरफेसशी संबंधित चिंतेचे निराकरण होईल. 

सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण M2M/IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) परिवेश तयार करण्यासाठी दूरसंचार विभाग वचनबद्ध आहे. राष्ट्रीय डिजिटल कम्युनिकेशन धोरणाचे उद्दिष्ट एक मजबूत डिजिटल कम्युनिकेशन पायाभूत सुविधा तयार करणे, पुढील पिढीचे तंत्रज्ञान सक्षम करणे आणि M2M/loT सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सर्वांगीण आणि सामंजस्यपूर्ण दृष्टिकोन सुनिश्चित करणे हे आहे.

"M2M कम्युनिकेशन्स मधील स्पेक्ट्रम, रोमिंग आणि सेवेची गुणवत्ता (QoS) संबंधित आवश्यकता" वरील भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या शिफारसी आणि M2M उद्योगातील भागधारकांचे मत विचारात घेतल्यानंतर सरकारने 'M2M सेवा प्रदात्यांची (M2MSP) नोंदणी प्रक्रिया आणि M2M सेवांसाठी WPAN/WLAN कनेक्टिव्हिटी प्रदात्यांची' मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे येथे उपलब्ध आहेत:

(https://dot.gov.in/latestupdates/guidelines-registration-process-m2m-service-providers-m2msp-and-wpanwlan-connectivity)

***

HarshalA/ShradhhaM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1993930) Visitor Counter : 113